वाळू व्यवसायिक संतोष जगताप यांचा श्रध्दांजली देणारा बॅनर लावल्याने सांगवीत खळबळ : पोलिसांनी लगेचच हटविला अनधिकृत बॅनर

अशा बॅनरबाजीमुळे तरुण मुलांच्यात गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वाटचाल होत

वाळू व्यवसायिक संतोष जगताप यांचा श्रध्दांजली देणारा बॅनर लावल्याने सांगवीत खळबळ : पोलिसांनी लगेचच हटविला अनधिकृत बॅनर

अशा बॅनरबाजीमुळे तरुण मुलांच्यात गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वाटचाल होत

बारामती वार्तापत्र

बारामती तालुक्यातील सांगवी येथील चांदणी चौकात वाळू व्यवसायिक संतोष जगतापच्या बॅनर लाऊन त्याला भावपूर्ण श्रध्दांजली देणारा अनधिकृत बॅनर सांगवी येथे झळकल्याने खळबळ उडाली .दरम्यान याची खबर माळेगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांना माहिती कळताच सांगवी येथे यांनी लगेचच धाव घेत गुन्हेगारांचे उद्दात्तीकरण रोखण्याच्या हेतूने बॅनरबाजी हटविण्याच्या सूचना देऊन बॅनर काढून टाकण्यात आला.

संतोष जगताप हा २०११ साली वाळू व्यवसायातून झालेल्या राहू हत्याकांड मधील मुख्य आरोपी होता. अशा बॅनरबाजीमुळे तरुण मुलांच्यात गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वाटचाल होत असते. याचे गांभीर्य ओळखून सहायक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांना माहिती मिळाल्याने बॅनरबाजीचा फ्लेक्स तात्काळ उतरविण्यात आला. यावेळी गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील यांना बोलावून घेऊन यापुढे अनधिकृत बॅनरबाजी हटवून परवानगी शिवाय बॅनर न लावण्याच्या सूचना देखील पोलीसांनी दिल्या आहेत.

गुन्हेगारांचे उद्दात्तीकरण होण्यास खऱ्या अर्थाने शत्रूला द्वेषभावना निर्माण होण्यासाठी बॅनरबाजी कारणीभूत ठरत असते. माळेगावसारख्या ठिकाणी बॅनरबाजीमधून भांडणाच्या घटना समोर आल्या होत्या. सांगवीत भावपूर्ण श्रध्दांजलीचा बॅनर झळकल्याने खळबळ उडाली. तालुका पोलिसांनी गुंडगिरी संपुष्टात आणली असतानाच पुन्हा छोटे मोठे गुंड डोके वर काढू लागले आहेत काय ? अशा चर्चांना उधाण आता आले आहे. मात्र, पोलिसांनी धडकपणे श्रध्दांजली देणारे अनधिकृत बॅनर हटविले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!