स्थानिक
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटूंबांना सामाजिक अर्थसहाय्य योजने अंतर्गत लाभ मंजूर
43 प्रकरणांना मंजूरी देण्यात आली.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटूंबांना सामाजिक अर्थसहाय्य योजने अंतर्गत लाभ मंजूर
43 प्रकरणांना मंजूरी देण्यात आली.
बारामती वार्तापत्र
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना तात्काळ लाभ देण्याच्या अनुषंगाने संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थी निवडीसाठी 13 डिसेंबर 2021 अखेर समितीचे अध्यक्ष धनवान वदक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत 43 प्रकरणांना मंजूरी देण्यात आली.
बैठकीत दारिद्र्य रेषेखालील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या तीन कुटुंबांना राष्ट्रीय कुटुंब लाभ अर्थसहाय्य योजनेअंतर्गत 20 हजार एक रकमी अनुदान देण्यात आले असे एकूण 46 लाभार्थ्यांना कोरोना सामाजिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गल लाभ देण्यात आले आहेत, असे तहसिलदार विजय पाटील यांनी कळविले आहे.