स्थानिक

वाहन मालकांना अटकावून ठेवलेली वाहने सोडवून घेण्याचे बारामती उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवाहन

120 वाहने येत्या 10 दिवसात सोडवून घ्यावीत

वाहन मालकांना अटकावून ठेवलेली वाहने सोडवून घेण्याचे बारामती उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवाहन

120 वाहने येत्या 10 दिवसात सोडवून घ्यावीत

बारामती वार्तापत्र 

बारामती उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने थकीत कर वसुलीसाठी मोटार वाहन कायद्यातील गुन्ह्यातंर्गत बारामती, इंदापूर, दौंड बसस्थानक आवारात अटकावून ठेवलेली 120 वाहने येत्या 10 दिवसात सोडवून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

वाहने सोडवून घेण्याकरिता अद्यापही वाहन मालाक, चालक आणि वित्तदाते आदींनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधलेला नाही किंवा हक्कही सांगतिला नाही. या वाहनांची यादी कार्यालयाच्या सूचना फलकांवर लावण्यात आली आहे.

विहीत मुदतीत वाहनांचा ताबा न घेतल्यास या वाहनांच्या जाहीर लिलावाची प्रक्रिया सुरु करण्यात येईल, लिलावाची तारीख, वेळ व ठिकाण eaution.gov.in/www.mstcindia.co.in या संकेतस्थळावर तसेच कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल.

अधिक माहितीकरिता कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही उप प्रादेशिक अधिकारी सुरेंद्र निकम यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Back to top button