इंदापूर

विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही : अंकिता पाटील ठाकरे

निरवांगी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न

विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही : अंकिता पाटील ठाकरे

निरवांगी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न

इंदापूर : प्रतिनिधी

निरवांगी येथील ५८.५ लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

निरवांगी येथील नवीन ग्रामपंचायत कार्यालयसाठी १५ लक्ष रुपये, पाणीपुरवठा व बंदिस्त गटार योजनेसाठी ६ लक्ष रुपये, मारुती मंदिर ते होळ शिंदे घर रस्ता कॉंक्रिटीकरण यासाठी ४ लाख ५० हजार रुपये व बी.के.बी.एन. रस्ता ते वाघुळ वस्ती रस्ता कॉंक्रिटीकरण व डांबरीकरण यासाठी ३५ लाख रुपये आपण मंजूर केला असून अजून विविध विकास कामांसाठी लागेल तेवढा निधी आपण हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंजूर करू, असे अंकिता पाटील ठाकरे यावेळी म्हणाल्या.

या भूमिपूजन व उद्घाटन सोहळ्याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य भारती दुधाळ, निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका संगीता पोळ, गावच्या सरपंच रेखा गायकवाड, उपसरपंच मंगल पेडकर व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button