अपघात दिसताच ताफा थांबवला; राज्यमंत्री भरणे यांनी अपघातग्रस्ताला दिला धीर..
महामार्गावर झालेला अपघात पाहताच भरणे यांनी घेतलेली तातडीने धाव अनेकांना माणुसकीचे दर्शन देणारी ठरली..

अपघात दिसताच ताफा थांबवला; राज्यमंत्री भरणे यांनी अपघातग्रस्ताला दिला धीर..
महामार्गावर झालेला अपघात पाहताच भरणे यांनी घेतलेली तातडीने धाव अनेकांना माणुसकीचे दर्शन देणारी ठरली..
इंदापूर :-प्रतिनिधी
नेता दुरदृष्टीचा असावा अशी सर्वांचीच अपेक्षा असते.त्याच बरोबर त्याच्यामध्ये मानवतेची दृष्टी असेल अन् कोणत्या ही प्रसंगात झटपट निर्णय घेण्याची क्षमता असेल तर ती सामान्य माणसाच्या हृदयात नक्कीच कायमचे घर करुन रहाते… असाच एक अनुभव आज राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यामुळे सर्वांनाच आला…. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा रविवार हा दिवस धावपळीचा आणि व्यस्ततेचा दिनक्रम असतो. इंदापूर तालुक्यात दिवसभर कार्यक्रमांची रेलचेल असल्यामुळे ते आज रविवारी दुपारी तालुक्यातील भिगवन येथील कार्यक्रमातून इंदापूर कडे परतत असताना पुणे- सोलापूर महामार्गावरती लोणी देवकर या ठिकाणी त्यांच्यासमोर अचानक एका कार चा अपघात झाला, ती कार रस्ता सोडून समोरच्या दुभाजकावर गेली, यावेळी भरणे यांनी त्यांचा ताफा ताबडतोब थांबवून तातडीने जखमींकडे धाव घेतली, यावेळी त्या कार मध्ये दोन प्रवासी होते, त्यांना गंभीर दुखापत झाली नव्हती मात्र मार जोरदार बसला होता, व ते दोघे ही या अपघातामुळे भयभीत झाले होते, या अपघातग्रस्तना धीर देत, त्याची विचारपूस करीत आपल्या गाडीतील पिण्याचे पाणी त्यांना दिले, व इतर काही मदत लागत आहे का? याची विचारपू्स करीत पुढे भरणे यांचा ताफा पुढे इंदापूर शहराकडे मार्गस्थ झाला..
यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतलेली तातडीने धाव अनेकांना माणुसकीचे दर्शन देणारी ठरली..