‘विकेल ते पिकेल’ संकल्पनेअंतर्गत युवा शेतकऱ्यांना मोफत प्रशिक्षण
वय 18 ते 40 वर्षे, शिक्षण इयत्ता 10 वी पर्यंत असावे.
‘विकेल ते पिकेल’ संकल्पनेअंतर्गत युवा शेतकऱ्यांना मोफत प्रशिक्षण
वय 18 ते 40 वर्षे, शिक्षण इयत्ता 10 वी पर्यंत असावे.
बारामती वार्तापत्र
‘विकेल ते पिकेल’ संकल्पनेअंतर्गत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि पुणे येथील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अग्रीकल्चर यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे बारामती तालुक्यातील 50 युवा शेतकऱ्यांसाठी 20 जानेवारी आणि 3 मार्च 2022 रोजी ‘कृषी निर्यात’ या विषयावर विनामूल्य प्रशिक्षण आयोजीत करण्यात येणार आहे.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अग्रीकल्चर ए विंग, 5 वा मजला, सेनापती बापट रोड, पुणे येथे हे प्रशिक्षण होणार आहे. प्रशिक्षणात भाग घेण्यासाठी युवा शेतकरी नोंदणीकृत शेतकरी गटाचा सदस्य असावा. त्याचे वय 18 ते 40 वर्षे, शिक्षण इयत्ता 10 वी पर्यंत असावे. प्रशिक्षणासाठी पूर्व नोंदणी आवश्यक आहे. शेतकरी नोंदणी मर्यादित असल्याने प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार आहे. नोंदणीसाठी गावातील कृषी सहाय्यकाशी संपर्क साधावा तसेच https://forms.gle/KzwpByFAEowh7TnE7 या लिंक वर आवश्यक माहिती भरून पूर्व नोंदणी करावी.
अधिक माहितीसाठी आत्माचे बारामती येथील बीटीएम विश्वजीत मगर (भ्रमणध्वनी क्र. 7588680590) आणि एटीएम गणेश जाधव (भ्रमणध्वनी क्र. 9405839779) यांच्याशी संपर्क साधावा असे तालुका कृषी अधिकारी एस. आर. बांदल यांनी केले आहे.