विजय रणस्तंभावरील ‘ति” वादग्रस्त ‘ पाटी काढा – भारत दादा अहिवळे
आपण तातडीने या संबंधीची कार्यवाही सुरू करावी.असे बैठकी मध्ये आंदोलकांनी सांगीतले
विजय रणस्तंभावरील ‘ति” वादग्रस्त ‘ पाटी काढा – भारत दादा अहिवळे
आपण तातडीने या संबंधीची कार्यवाही सुरू करावी.असे बैठकी मध्ये आंदोलकांनी सांगीतले
बारामती वार्तापत्र
भिमाकोरेगाव येथील विजय रणस्तंभावर १ जानेवारी १८१८ च्या लढाईशी कोणताही संबंध नसताना विजय रणस्तंभावर लावण्यात आलेली सन १९६५ व १९७१ च्या भारत-चीन,भारत-पाक युद्धातील शाहिद जवानांच्या नावाची पाटी काढून टाकावी व १८१८ च्या लढाईतील शूरवीरांचा आणि त्या शहीद जवानांचा सन्मान राखून विजय रणस्तंभाचे प्रशासकीय पातळीवर होत असलेले विकृतीकरण थांबवावे.या मागणीसाठी बारामतीचे माजी उपनगराध्यक्ष व शेरसुहास मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भारत(दादा) अहिवळे हे दि.१० डिसेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यलया समोर आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह चक्री उपोषणा साठी बसले होते.यावेळेस त्यांना पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील तब्बल ८० आंबेडकरप्रेमी व बहुजनप्रेमी संघटनांनी पाठिंबा दर्शविला होता.
जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी बोलावले.त्या मध्ये विजय रणस्तंभावर लावण्यात आलेल्या वादग्रस्त पाटी संदर्भात चर्चा झाली.येणाऱ्या काळात जर ही वादग्रस्त पाटी विजय रणस्तंभावरून काढली नाही तर महाराष्ट्रात सामाजिक अशांतता निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवू शकतो.त्यामुळे आपण तातडीने या संबंधीची कार्यवाही सुरू करावी.असे बैठकी मध्ये आंदोलकांनी सांगीतले.
जिल्हाधिकाऱ्यांनी चा विषयावर तातडीने विजय रणस्तंभाच्या संबंधित सर्व विभागांना पत्र पाठवून या संबंधीचा अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत व अहवाल आल्या नंतर आम्ही कारवाई करू असे आश्वासन दिले. गेल्या १० दिवसां पासून सुरू असलेले चक्री उपोषण दि.१८ डिसेंबर रोजी झालेल्या जिल्हाधिकाऱ्यां सोबतच्या सकारत्मक बैठकी नंतर आम्ही तात्पुरते स्थगित करत असल्याची माहिती शुभम अहिवळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगिताली
दरम्यान यावेळी भारतदादा अहिवळे यांच्या समवेत भीमा कोरेगाव चौकशी आयोगाचे जेष्ठ विधिज्ञ ॲड.बी.जी.बनसोडे, भारतीय दलित कोब्राचे नेते ॲड.भाई विवेक चव्हाण,भारत मुक्ती मोर्चा चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सचिन बनसोडे,दलित पँथर चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ.घनश्याम भोसले,भारत मुक्ती मोर्चाचे ॲड.सुशिल अहिवळे, भिम आर्मीचे अभिजित गायकवाड, भिम ब्रिगेड चे जयदीप सकट व शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.