विज्ञान जत्रेत मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांकडून शंभर प्रकल्प सादर
विज्ञान जत्रेत विद्यार्थ्यांनी प्रकल्प सादर केले
विज्ञान जत्रेत मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांकडून शंभर प्रकल्प सादर
विज्ञान जत्रेत विद्यार्थ्यांनी प्रकल्प सादर केले
बारामती वार्तापत्र
सांगवी : राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी येथे विज्ञान जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांमध्ये शाळेतील जवळपास दोनशे मुलांनी शंभराहून अधिक लहान-मोठे प्रकल्प सादर केले.
कार्यक्रमाचे उदघाटन उपसरपंच अनिल काळे,ग्रामपंचायत सदस्य प्रणव तावरे, सुधाकर जगताप, व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. दैनंदिन जीवनातील विज्ञानावर आधारित वैज्ञानिक प्रयोगापासून रोबोटिक्स पर्यंतचे अनेक प्रयोग विद्यार्थ्यांनी सादर केले.
हवेचा दाब,हवा जागा व्यापते,रोबोट,जेसीबी,ज्वलनासाठी ऑक्सिजनची आवश्यकता,उष्णतेचे संवहण,डान्सिंग बाॅल,द्रवाची घनता,पृथ्वीचे परिवलन व त्याचे परिणाम, रेषीय गती व त्याचे प्रकार,दो-यावर चालणारा ग्रामोफोन असे अनेक भन्नाट प्रयोग विद्यार्थ्यांनी सादर केले. भेट देणाऱ्या मान्यवरांनी व ग्रामस्थांनी तसेच शिक्षकांनी मुलांकडून कुतुहलाने प्रयोगाबद्दल माहिती जाणून घेतली.
मुलेही मोठ्या उत्साहाने प्रयोगाचे सादरीकरण व त्याचे विश्लेषण करत होती. मुख्याध्यापिका छाया गायकवाड,शिक्षक मारुती जगताप,हर्षदा जगताप,संतोष पाथरकर,राजेंद्र सोनवणे,अश्विनी कुंभार,शांता बालगुडे,दिगंबर बालगुडे,संजय गायकवाड, सुनिता खलाटे,भाग्यश्री कलढोणे,संगीता झगडे सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.