विद्याप्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय बारामतीयेथील चतृर्थ वर्ष संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न
विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन या सर्वांचा सन्मान केला.
विद्याप्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय बारामतीयेथील चतृर्थ वर्ष संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न
विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन या सर्वांचा सन्मान केला.
बारामती वार्तापत्र
विद्याप्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय बारामती येथील तृतीय वर्ष संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यानी चतृर्थ वर्ष संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ करण्याचे आयोजन १० जून २०२२ रोजी केल होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्री. रा. स. बिचकर, संगणक विभागाचे विभागप्रमुख डॉ. श्री. चैतन्य कुलकर्णी, डॉ. श्री. दि. भ. हंचाटे, डॉ. श्री. संताजी शिंदे, श्री. व्यंकटेश रामपूरकर, श्री. श्रीकांत ढगे, श्री. मनोज शेलार, श्री. प्रदीप पैठणे, प्रसारमाध्यम विभागाचे श्री. सुनिल भोसले, श्रीमती. एन. पी. शहा हे सर्वजन या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी उपस्थितीत असणाऱ्या शिक्षकांना व चतृर्थ वर्ष संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन या सर्वांचा सन्मान केला. यामध्ये चतृर्थ वर्ष संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी मागील चार वर्षाच्या अनेक आठवणीना आपल्या मनोगतातून उजाळा दिला.
प्राचार्य डॉ. श्री. रा. स. बिचकर, विभागप्रमुख डॉ. श्री. चैतन्य कुलकर्णी, डॉ. श्री. दि. भ. हंचाटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व चतृर्थ वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना पुढील भावी आयुष्यासाठी आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. उपस्थितीतांच्या आग्रहास्तव . श्री. दि. भ. हंचाटे यांनी सर्वांसाठी गीत गायले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्राची जोशी या विद्यार्थिनीने केले. त्यानंतर स्नेहभोजन झाले व कार्यक्रमाची सांगता झाली.