विद्याप्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळा बारामती येथे विद्यार्थ्यांकडून सायबर सुरक्षेचे धडे
‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’

विद्याप्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळा बारामती येथे विद्यार्थ्यांकडून सायबर सुरक्षेचे धडे
‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’
बारामती वार्तापत्र
विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या उपक्रमांतर्गत बारामतीतील विद्यार्थ्यांनी बारामती येथील विद्याप्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळेत विशेष जनजागृती कार्यक्रम घेतला.
या उपक्रमात शिवानी चेडे, विनया लाखे या विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे दिले.
इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे सायबर क्राईमचे प्रमाण कसे वाढत आहे, त्यापासून बचाव करण्यासाठी कोणत्या दक्षता घ्याव्यात, सुरक्षित पासवर्ड्स, अज्ञात लिंक्सवर क्लिक न करणे, सोशल मीडियावरील वैयक्तिक माहितीचे योग्य रक्षण अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले.
सायबर सुरक्षा ही आजच्या डिजिटल युगातील महत्त्वाची गरज असल्याचे प्रतिपादन करून विद्यार्थ्यांनी विविध उदाहरणांद्वारे सायबर फसवणुकीपासून कसे वाचता येईल याचे प्रात्यक्षिक दाखवले.
उपस्थित विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि सायबर अवेअरनेसविषयी उत्सुकता व्यक्त केली.
‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या उपक्रमाचा बारामती येथे झालेला हा टप्पा यशस्वी ठरला असून, विद्यार्थ्यांनी घेतलेली ही पुढाकार समाजात डिजिटल सुरक्षिततेबद्दल जनजागृती करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.