विद्यार्थ्यांकडून सायबर सुरक्षेचे धडे — घाडगे अकॅडमीत कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
समाज सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहावा.

विद्यार्थ्यांकडून सायबर सुरक्षेचे धडे — घाडगे अकॅडमीत कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
समाज सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहावा.
बारामती वार्तापत्र
घाडगे अकॅडमी, बारामती येथे ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या उपक्रमांतर्गत सायबर जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कृत्रिम बुद्धिमत्ता विषयाचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण माहिती देण्यासाठी हा कार्यक्रम पार पडला.
क्विक हिल फाउंडेशन व विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमात विद्या प्रतिष्ठानचे विद्यार्थी प्रतीक मरळ व अथर्व संकपाळ यांनी प्रभावी सादरीकरण करत सायबर गुन्ह्यांपासून बचावाच्या उपाययोजना स्पष्टपणे मांडल्या.
फोटो मॉर्फिंग, आर्थिक फसवणूक, अनोळखी कॉल्स, फेक लिंक्स अशा धोक्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबत विद्यार्थ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमानंतर घाडगे अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक श्री. श्रीकांत घाडगे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले, “समाज सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहावा यासाठी विद्यार्थ्यांनी घेतलेला पुढाकार निश्चितच प्रशंसनीय आहे.”