विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण थांबवून देशपांडे विद्यालयावर अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करावा
रिपब्लिकन पार्टी च्या वतीने जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन

विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण थांबवून देशपांडे विद्यालयावर अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करावा
रिपब्लिकन पार्टी च्या वतीने जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन
बारामती वार्तापत्र
कै. ग.भि.देशपांडे विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय या शाळेत अनुसुचित जाती जमातीमधील विद्यार्थ्यांचे होत असलेले आर्थिक शोषण थांबवून संबंधीत विद्यालयातील मुख्याध्यापक, संस्था चालक आणि स्थानिक समितीवर अनुसुचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात यावे यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या वतीने पुणे जिल्हा परिषद जिल्हा शिक्षण अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
बारामती मधील कै. ग. भि. देशपांडे विद्यालय व उच्च माध्य. विद्यालय ही शाळा
शासनाच्या १०० टक्के अनुदानित शाळांमध्ये समाविष्ट आहे. शासनाच्या धोरण व निर्णयाप्रमाणे
अनुसुचित जाती-जमातींच्या विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारू नये असे शासनाचे नियम व धोरण कायदा आहे. असे असताना देखील जातीय द्वेषातुन संस्थाचलाक व मुख्याध्यापक शिक्षकांच्या मदतीने अनुसुचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांवर आर्थिक अन्याय करीत आहेत. अनेक विद्यार्थ्यांचे गुणपत्रक दिले जात नाहीत तसेच पालकांना भ्रमणध्वनीवर फी भरण्यासंबंधी आग्रह धरला जात आहे. त्यांच्या स्वाध्याय वहृया स्विकारल्या जात नाहीत असे करणे म्हणजे विद्यार्थी व पालकांवर घोर अन्याय आहे. शासन निर्णय व कायद्याचा अवमान केला जात आहे. आर्थिक शोषण व नफेखोरी हा कायद्याने गुन्हा आहे. असे असताना देखील संबंधीत शाळेमध्ये असणारे संस्थाचालक व
मुख्याध्यापक हे कायदा न जुमानणारे, जातीयद्वेषाने भरलेले विकृत मनोवृत्तीचे आहेत. तरी त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याचा अधिकार कायद्याने आपणांस दिलेला आहे. तरी या
अधिकाराचा वापर करून संबंधीत संस्थाचालक व मुख्याध्यापकांवर अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा
दाखल करावा आणि शासन निर्णयाचा आदर करण्यात यावा अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) आपणाविरूध्द तीव्र आंदोलन करणार असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी चे पुणे युवक सरचिटणीस रविंद्र सोनवणे, शहर सचिव सम्राट गायकवाड या सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.