विद्यार्थ्यांच्या हितासाठी अनुजा सुशांत पाटील फाउंडेशन कार्यरत राहणार : अॅड. अनुजा पाटील
गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत

विद्यार्थ्यांच्या हितासाठी अनुजा सुशांत पाटील फाउंडेशन कार्यरत राहणार : अॅड. अनुजा पाटील
गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत..
इंदापूर;प्रतिनिधि
“सामाजिक जाणिवेतून सुरू झालेली अनुजा सुशांत पाटील फाउंडेशन विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करत आहे. शेतकरी वर्गातून पुढे आलेले हे कुटुंब आज एका उदात्त भावनेतून काम करीत आहे. शिक्षणासाठी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहे. यापुढेही असेच काम सातत्याने सुरू राहील,” असे मत सामाजिक कार्यकर्त्या व शिक्षण क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व ॲड. अनुजा पाटील यांनी येथे व्यक्त केले.
पुण्यातील धायरीमध्ये नारायणराव सणस विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज मधील आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरण करण्यात आले. ज्ञानाच्या वाटेवर नवचैतन्याचा प्रकाश पेरणाऱ्या अशा अत्यंत अर्थपूर्ण आणि समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्याना त्यांच्या हस्ते शिष्यवृत्तीचे वाटप सुपूर्त करण्यात आले. ही रक्कम मुलांना संस्थेकडून त्यांच्या खात्यात देण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना म्हणाल्या की, “ही केवळ शिष्यवृत्तीच नव्हे तर ती गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील आशेचा किरण आहे. या संकल्पनेचा पाया माणुसकीच्या मूल्यावर, शिक्षणप्रेमावर आणि समाजभानाच्या जाणिवेवर रचण्यात आला आहे. ही संस्था शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, पर्यावरण आणि गरजूंच्या कल्याणासाठी अत्यंत संवेदनशीलपणे कार्य करते.”
डॉ. डी. वाय. पाटील एज्युकेशन फाऊंडेशनचे कार्यकारी संचालक विद्यानंद मानकर म्हणाले, “मध्यम वर्गातील विद्यार्थ्यांना मदत करण्याचा याचा उद्देश आहे. अनुजा सुशांत पाटील फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्रातील ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना अनेक प्रकारे मदत केली जाते असे त्यांनी नमूद केले. यामुळे विद्यार्थ्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आवश्यक ती मदत देणार असल्याचेही ते म्हणाले. मुलांनीही त्यांच्या आयुष्यात इतरांना मदत करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
याप्रसंगी फाऊंडेशनचे वित्त नियंत्रक रोहन पवार, संचालक गणेश चव्हाण, प्रकल्प संचालक श्रीराम चव्हाण, प्रकल्प अधिकारी मदन आडे, प्राचार्य रोडे सर, उपप्राचार्या रोहिणी पवार डॉ. सुभाष राठोड आणि विद्यालयाचा शिक्षकवृंद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. संस्थेच्या वतीने शिष्यवृत्तीच्या रकमेमुळे पालक आणि विद्यार्थी वर्ग समाधानी असल्याचे यावेळी मत व्यक्त करण्यात आले.