विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, नवक्रांती सेवाभावी संस्था बारामती यांच्या सयुक्त विध्यमाने “आदर्श माता पिता व वीरमाता पिता पुरस्कार वितरण सोहळा ” यशस्वीरीत्या संपन्न.
स्वामी समर्थाची मूर्ती व पेरूचे छोटेसे रोपटे देवून हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रधान करण्यात आला.
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, नवक्रांती सेवाभावी संस्था बारामती यांच्या सयुक्त विध्यमाने “आदर्श माता पिता व वीरमाता पिता पुरस्कार वितरण सोहळा ” यशस्वीरीत्या संपन्न.
स्वामी समर्थाची मूर्ती व पेरूचे छोटेसे रोपटे देवून हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रधान करण्यात आला.
बारामती वार्तापत्र
विद्याप्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय बारामती व नव क्रांती सेवाभावी संस्था बारामती, यांच्या सयुक्त विध्यमाने दिनांक २८ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १०.३० या वेळेत मुख्य इमारतीच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये हा उपक्रम राबविण्यात.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी मा. श्री. धनंजय जामदार (अध्यक्ष बारामती इंडस्ट्रीयल असोसिएशन), मा. श्री. अमोल गोंजारी (आगर व्यवस्थापक रा. प. एम. आय. डी. सी. बारामती) , मा. श्री. निलेश काटे (सरचिटणीस राष्ट्रीय युवक कॉंग्रेस सातारा), मा. श्री. शशांक मोहिते (भाषण कला प्रशिक्षक), मा. श्री. गणेश शिंदे (ग्रामिण कलाकार मोहळ) , मा. श्री. नंदू मोरे (कृषीपुत्र) तसेच प्राचार्य मा. डॉ. श्री. रा. स. बिचकर हे मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवराना स्वामी समर्थाची मूर्ती व पेरूचे छोटेसे रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन या कार्यक्रमाचे सर्वेसर्वा श्री. चक्रपाणी चाचर व महाविद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापिका श्रीमती ज्योती भोंग यांनी केले.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा समाजातील उपेक्षित, कष्टकरी व अत्यंत बिकट परिस्थितीतून कणखरपणे उभ्या राहिलेल्या समाजतील तळागाळातील सर्वसामान्य माणसाचा व त्याच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणे हा होता. या कार्यक्रमामध्ये वीर मातापिता हा पुरस्कार श्री किसन इंगवले व श्रीमती विजया इंगवले यांना तसेच वीर पत्नी पुरस्कार श्रीमती गौरी इंगवले यांना, शूर योद्धा हा पुरस्कार– श्री. प्रदीप कदम व शौर्य पुरस्कार श्री. रियाज तांबोळी तसेच आदर्श माता पिता हा पुरस्कार– श्रीमती स्वरूपा शहा, वंदना टरले, पूजा निकाळजे, राजश्री सत्रे, सुनंदा गायकवाड, लत्ता वाघमोडे, मनीषा शिळीमकर, सुभाष मोरे व सुनंदा मोरे, मिलिंद शिंदे व लता शिंदे, बाळासाहेब पोमणे व हौसाबाई पोमणे, तुकाराम कांबळे व सुभद्रा कांबळे, स्वाती सावंत व जालिंदर सावंत, मीरा जाधव या सर्वाना प्रमाणपत्र, मानचिन्ह, स्वामी समर्थाची मूर्ती व पेरूचे छोटेसे रोपटे देवून हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रधान करण्यात आला.
आदर्श/गुणवंत कामगार पुरस्कार श्री. दत्तात्रय बारवकर यांना. आदर्श ग्रामिण कलाकार पुरस्कार श्री. नंदू मोरे यांना, आदर्श/गुणवंत पत्रकार श्री. संतोष शेंडकर यांना, आदर्श/गुणवंत शिक्षक/ शिक्षिका पुरस्कार– वैशाली काटे-निंबाळकर, अनिल चाचर यांना स्वयंसिद्धा लघु उदोजक पुरस्कार– सुवर्णा कचरे, शिवानी घोगरदरे यांना, करोनाकाळात करोना रुग्णांना मोफत जेवणाचे डब्बे दिल्याबद्दल श्री. उमेश गंगावणे व श्री. विकास सुर्वे या सर्व पुरस्कार्थीचा मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह, स्वामी समर्थाची मूर्ती व पेरूचे छोटेसे रोपटे देवून गौरव करण्यात आला.
त्यानंतर या कार्यक्रमाचे सर्वेसर्वा श्री. चक्रपाणी चाचर यांनी उपस्थितांसाठी आईची महती सांगणाऱ्या कवितेचे गायन केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्रीमती. स्वरूपा शहा, कृषीपुत्र नंदू मोरे, अनिल चाचर, रवी शिंदे, निलेश काटे संतोष शेंडकर, शशांक मोहिते, या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. श्री. धनंजय जामदार यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात समाजातील तळागाळातील या लोकांना शोधून त्यांच्या कार्याचा गौरव केल्याबद्दल विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, व नवक्रांती सेवाभावी संस्था बारामती यांचे आभार मानले व यापुढे अशा कार्यक्रमासाठी आपण सदैव मदत करू व या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहू असा मनोदय व्यक्त केला.
तसेच प्राचार्य डॉ. रा. स. बिचकर यांनी आपल्या भाषणात या कार्यक्रमात ज्या लोकांना पुरस्कार प्राप्त झाला अशा लोकांचे मनापासून कौतुक केले तसेच या कार्यक्रमाचे सर्वेसर्वा श्री. चक्रपाणी चाचर यांसारखी सेवाभावीवृत्तीची अनेक लोक तयार झाली पाहिजेत हि लोक हि समाजाची उर्जा आहेत असे गौरव उदगार त्यांनी आपल्या भाषणात काढले.
या कार्यक्रमासाठी सहाय्यक प्राध्यापिका श्रीमती पल्लवी बोके व सहाय्यक प्राध्यापक प्रदीप पैठणे यांचे महत्वपूर्ण असे सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी प्रसारमाध्यमाचे डॉ. दि. भ. हंचाटे व श्री. सुनिल भोसले हे उपस्थितीत होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नव क्रांती सेवाभावी संस्था बारामतीच्या खजिनदार श्रीमती मंजुश्री शिंदे यांनी केले. या कार्यक्रमासाठी संस्थेच्या विश्वस्त सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष श्री. अशोक प्रभुणे, सचिव निलीमाताई गुजर, खजिनदार श्री. युगेंद्र पवार, विश्वस्थ डॉ. राजीव शहा, मंदार सिकची, रजिस्टार श्री. श्रीश कंभोज या सर्वांचे महत्वपूर्ण असे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. शेवटी वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.