विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी, महाविद्यालयाला “बारामती इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट असोसिएशन (बिडा)” यांची भेट
“सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर युथ डेव्हलपमेंट”

विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी, महाविद्यालयाला “बारामती इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट असोसिएशन (बिडा)” यांची भेट
“सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर युथ डेव्हलपमेंट”
बारामती वार्तापत्र
बारामती इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. धनंजय जामदार, सचिव श्री. अनंत अवचट, क्रिडाई अध्यक्ष दत्तात्रय बोराडे, आयएसएमटीचे माजी उपाध्यक्ष श्री. किशोर भापकर, अभिजित शिंदे, मनोहर गावडे, अंबरशहा शेख, मनोज पोतेकर आणि इतर सदस्य यांनी प्रथमता महाविद्यालयातील “सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर युथ डेव्हलपमेंट” – सौजन्य भारत फोर्ज प्रा. लि. या अत्याधुनिक प्रयोगशाळेला भेट दिली.
त्या प्रयोगशाळेतील अध्ययवत तंत्रज्ञानाची माहिती डॉ. ज्योती रंगोले तसेच डॉ. बिपिन गावंडे यांनी या सर्व सदस्यांना दिली. त्यानंतर औद्योगिक क्षेत्राला महत्त्वपूर्ण असे अद्यावत तंत्रज्ञान माहिती करून देण्यासाठी या महाविद्यालयात असणारे “सेंटर ऑफ एक्सलन्स इन डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग अँड रोबोटिक ऑटोमेशन” सेंटरला भेट दिली.
त्यामध्ये सिम्युसॉफ्ट कंपनीचे कर्मचारी तसेच त्या लॅबचे प्रमुख प्रा. दादासाहेब रुपनवर तसेच मेकॅनिकल अभियांत्रिकी शाखेच्या विभाग प्रमुख प्रा. डॉ. मनीषा लांडे यांनी या “बारामती इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट असोसिएशन (बिडा)” सदस्यांना एक्सलन्स सेंटरची संपूर्ण माहिती दिली. महाविद्यालयाचे इंडस्ट्रियल अधिष्ठता डॉ. रविंद्र पाटील व प्राचार्य सुधीर लांडे यांनी आलेल्या या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर लांडे यांनी महाविद्यालयाच्या बारामती इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट असोसिएशनडून कोणत्या गोष्टींची अपेक्षा आहे तसेच बारामती इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट असोसिएशनला या महाविद्यालयाकडून कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे या विषयावर सविस्तर सखोल चर्चा झाली. तसेच बारामती औद्योगिक क्षेत्रातील या उद्योगधंद्यांसाठी महाविद्यालय नवनवीन तंत्रज्ञान जसे की, एआय, आय ओटी हे तंत्रज्ञान औद्योगिक क्षेत्रासाठी कसे महत्त्वपूर्ण आहे व त्यामुळे या क्षेत्रात कशी क्रांती घडेल याची याविषयीची माहिती दिली.
तसेच त्याविषयीच्या कार्यशाळा घेणे आणि महाविद्यालय व बारामतीच्या औद्योगिक परिसरातील उद्योगधंदे, कारखानदारी यांच्यामध्ये परस्परांशी सामंजस्य करार करून परस्परांमधील चांगले संबंध प्रस्थापित करून त्याचा विद्यार्थ्यांना व औद्योगिक क्षेत्राला कसा फायदा होईल याविषयी देखील चर्चा झाली. त्यानंतर चहा पानाचा कार्यक्रम झाला आणि कार्यक्रमाची सांगता झाली.