शैक्षणिक

विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामतीत “नभांगन २०२५” तसेच कुरुक्षेत्र २०२५ दोन्ही उत्सव दिमाखात साजरे

वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामतीत “नभांगन २०२५” तसेच कुरुक्षेत्र २०२५ दोन्ही उत्सव दिमाखात साजरे

वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

बारामती वार्तापत्र 

महाविद्यालयात सालाबादप्रमाणे सादर होणारे “नभांगन २०२५” हा वार्षिक स्नेहसंमेलनाचा तसेच कुरुक्षेत्र २०२५ हा क्रीडा स्पर्धा असे दोन्ही उत्सव अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरे करण्यात आले. महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

या क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक डॉ. बिपिन पाटील व श्री संतोष जानकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. त्याचा बक्षीस वितरण समारंभ १८ फेब्रुवारी २०२५ रोजी संस्थेचे सदस्य डॉ. राजीव शहा यांच्या शुभहस्ते पार पडला.

२० फेब्रु. २०२५ रोजी सकाळी महाराष्ट्राची संस्कृती, कला, संस्कार याचे दर्शन घडविणारी सांस्कृतिक दिंडी व दुपार नंतर थीम डे. २१ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ट्रेझर हंट व दुपारी फोक डान्स, टाय, ब्लेजर आणि साडी डे हे कार्यक्रम संपन्न झाले. तदनंतर संध्याकाळी ०७ ते ०९ या वेळेत महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांसाठी स्वादिष्ट स्नेहभोजनाची अत्यंत उत्कृष्ट व्यवस्था केली होती.

२२ फेब्रु. २०२५ सकाळी कला दालन यामध्ये विद्यार्थ्यांनी काढलेली रांगोळी, हस्तचित्र, छायाचित्र, कविता यांचे प्रदर्शन व स्पर्धा व दुपारी महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांची वार्षिक सभा पार पडली. संध्याकाळी स्नेहसंमेलनाचा मुख्य आकर्षणाचा कार्यक्रम म्हणजेच “सांस्कृतिक संध्याकाळ ” ही संस्थेच्या गदिमा सभागृहामध्ये संध्याकाळी ५:०० ते ९.५० या वेळेत अत्यंत उत्साहात आणि जोशपूर्ण वातावरणात साजरी झाली.

याच कार्यक्रमाच्या दरम्यान महाविद्यालयात प्रत्येक विद्याशाखेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या तसेच वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये विद्यापीठ व राज्यस्तरावर नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या यशस्वी विद्यार्थी व शिक्षक यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य व व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन करण्यात आला.

या कार्यक्रमा दरम्यान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, क्रीडा विभाग, विद्यार्थी विकास आणि सांस्कृतिक कक्ष या सर्व विभागांमार्फत संपूर्ण वर्षभरात जे विविध सामाजिक, शैक्षणिक, समाज उपयोगी उपक्रम राबविले गेले याचा संपूर्ण आढावा ध्वनी चित्रफीतीच्या माध्यमातून सर्वांसाठी दाखविण्यात आला.

या कार्यक्रमात महाविद्यालयातील एकूण ३४ विद्यार्थ्यांच्या गटांनी अत्यंत हिरारीने व उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यामध्ये लोकनृत्य, नाटक, चित्रपट गीत, समूह नृत्य, या सारख्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे सर्वात मानाचे व अंतिम सन्मान चिन्ह महाविद्यालयातील माहिती आणि तंत्रज्ञान या शाखेच्या विद्यार्थ्यांनी मिळविले. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर लांडे, विद्यार्थी कार्यक्रम प्रमुख डॉ. परशुराम चित्रगार, सांस्कृतिक समन्वयक प्रा. पल्लवी बोके, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अनिल पाटिल, क्रीडा प्रतिनिधी अभिषेक मोकाशी, महिला प्रतिनिधी स्वप्नाली भोई, जनरल सेक्रेटरी अभिषेक शिर्के, सांस्कृतिक सचिव प्रथमेश शिंदे तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख, अधिष्ठाता, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे अत्यंत मोलाचे सहकार्य लाभले.

हा संपूर्ण कार्यक्रम उत्कृष्ट नियोजनात व कोणतेही गालबोट न लागता अत्यंत जल्लोषपूर्ण वातावरणात व दिमाखात पार पडला त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर लांडे यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मनापासून आभार मानले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुदर्शन राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार तसेच संस्थेच्या विश्वस्त तथा राज्यसभा खासदार सौ. सुनेत्रा वहिनी पवार, उपाध्यक्ष अ‍ॅड. अशोक प्रभुणे, सचिव अ‍ॅड. नीलिमा गुजर, सदस्य राजीव शहा या सर्वांची उपस्थिती व मार्गदर्शन या कार्यक्रमाला लाभले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समित्याच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत ओघवत्या व मोजक्या भाषेत केले. शेवटी वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!