विद्या प्रतिष्ठानचे कमल नयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालय बारामती येथील यांत्रिकी (मेकॅनिकल) अभियांत्रिकी विभागातर्फे आयोजित “प्रकल्प आणि पोस्टर सादरीकरण स्पर्धा” यशस्वीरित्या संपन्न
प्राचार्य डॉ. श्री. रा. स. बिचकर यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
विद्या प्रतिष्ठानचे कमल नयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालय बारामती येथील यांत्रिकी (मेकॅनिकल) अभियांत्रिकी विभागातर्फे आयोजित “प्रकल्प आणि पोस्टर सादरीकरण स्पर्धा” यशस्वीरित्या संपन्न
प्राचार्य डॉ. श्री. रा. स. बिचकर यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
बारामती वार्तापत्र
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालय बारामती येथील यांत्रिकी (मेकॅनिकल) अभियांत्रिकी विभागातर्फे दिनांक २४ आणि २५ मे २०२२ रोजी दोन दिवसीय “प्रकल्प आणि पोस्टर सादरीकरण स्पर्धा” आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी तब्बल ३१ प्रकल्प गटांनी सहभाग नोंदविला. यामध्ये होम ऑटोमेशन, आय. ओ. टी, रोबोटिक्स, वेहिकल ऑटोमेशन तसेच इतर विविध अत्याधुनिक विषयावरती विद्यार्थ्यांनी प्रकल्प आणि पोस्टर सादर केले. कार्यक्रमाचे उदघाटन प्राचार्य डॉ. रा. स. बिचकर यांनी केले.
यावेळी प्राचार्यांनी महाविद्यालयाचे वेगवेगळ्या कंपनीशी होत असलेले शैक्षणिक करार आणि त्या मधून विद्यार्थ्यांना नोकरीच्या नवनवीन उपलब्ध होणाऱ्या संधी याची माहिती दिली. तसेच यांत्रिकी (मेकॅनिकल) अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ सचिन भोसले यांनी विभागांमध्ये चालू असलेले प्रकल्प, त्यासाठी विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांची होत असलेली शैक्षणिक प्रगती याची माहिती दिली.
या कार्यक्रमासाठी डॉ. राजवीर शास्त्री, डॉ. बाळासाहेब पाटील, डॉ. दिनेश हंचाटे, प्रसार माध्यम विभागाचे श्री. सुनिल भोसले तसेच यांत्रिकी (मेकॅनिकल) चे सर्व प्राध्यापक आवर्जून उपस्थित होते. यांत्रिकी (मेकॅनिकल) अभियांत्रिकी विभागातर्फे सौ. प्राची काळे आणि श्री. केशव जाधव यांनी द्वितीय वर्षाच्या प्रकल्प आणि पोस्टरचे परीक्षण केले, तसेच चौथ्या वर्षातील विद्यार्थ्यांना सर्व यांत्रिकी (मेकॅनिकल) अभियांत्रिकी विभागाच्या प्राध्यापकांनी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन करून त्यांचा प्रकल्प आणि पोस्टरचे परीक्षण केले. यांत्रिकी (मेकॅनिकल) अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी ऑटोमेशन्स, आय. ओ. टी. मध्ये प्रकल्प सादर करून यांत्रिकी क्षेत्रासाठी भविष्यात चांगल्या संधी उपलब्ध आहेत हे सर्वांच्या निदर्शनास आणून दिले.
हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी समन्वयक श्री. श्रीकांत महाडिक यांनी विशेष योगदान दिले, या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. श्री. रा. स. बिचकर यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासू वृत्ती जागृती व्ह्यावी तसेच त्यांच्यामधील सुप्त गुणांचा विकास होऊन त्यांच्यामधून उद्याचे भावी संशोधक वृत्तीचे अभियंते तयार व्हावेत या उदात्त हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या नाविन्यपूर्ण व आगळ्या वेगळ्या अशा उपक्रमाचे संस्थेच्या विश्वस्त सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष श्री. अशोक प्रभुणे, सचिव निलिमाताई गुजर, खजिनदार श्री. युगेंद्र पवार, विश्वस्त डॉ. राजीव शहा, श्री. मंदार सिकची, श्री. किरण गुजर, श्री. श्रीश कंबोज या सर्वांनी विशेष कौतुक केले.