विद्या प्रतिष्ठानचे व्हीपीकेबीआयईटी, बारामती येथे स्थापत्य अभियांत्रिकी शाखेच्या २०१३ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे संमेलन
जुन्या आठवणींना उजाळा

विद्या प्रतिष्ठानचे व्हीपीकेबीआयईटी, बारामती येथे स्थापत्य अभियांत्रिकी शाखेच्या २०१३ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे संमेलन
जुन्या आठवणींना उजाळा
बारामती वार्तापत्र
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती महाविद्यालयाच्या स्थापत्य अभियांत्रिकी शाखेच्या २०१३ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे संमेलन महाविद्यालयाच्या नवीन बिल्डिंग मधील सभागृहात उत्साहात पार पडले.
या संमेलनात १३ माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. दीर्घ कालावधीनंतर म्हणजे १२ वर्षांनी एकत्र आले आणि जुन्या आठवणींना उजाळा देत महाविद्यालयातील त्या दिवसांच्या आठवणींमध्ये रमले.
२०१३ बॅचचे भारतासह परदेशात स्थायिक असलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या उद्योग व नोकरीच्या अनुभवांचे आदान-प्रदान केले. संमेलनात स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध करिअर पर्यायांवर विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले, जिथे उद्योजक, सरकारी अधिकारी आणि खाजगी क्षेत्रातील यशस्वी अभियंत्यांनी आपले अनुभव कथन केले.
बांधकाम क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरू करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी कंत्राटी व्यवसाय (Contracting), सिव्हिल कन्सल्टन्सी, आर्किटेक्चरल प्लॅनिंग, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ग्रीन बिल्डिंग टेक्नोलॉजी यांसारख्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले. सरकारी सेवा PWD (Public Works Department), नगररचना विभाग (Town Planning), जलसंपदा विभाग (Irrigation), महापालिका, MPSC आणि UPSC परीक्षा तसेच खाजगी क्षेत्रातील जागतिक स्तरावरील संधी आणि कौशल्ये जसे कि, स्ट्रक्चरल डिझाइन, प्रकल्प व्यवस्थापन (Project Management), ऑईल & गॅस सेक्टर, रस्ते आणि पूल बांधकाम, मेट्रो प्रकल्प, BIM (Building Information Modeling), आणि ग्रीन बिल्डिंग टेक्नॉलॉजी यांसारख्या क्षेत्रांत रोजगार संधी कशा मिळवायच्या याबाबत माहिती देण्यात आली.
स्टेनेबल कन्स्ट्रक्शन (Sustainable Construction), स्मार्ट सिटी प्रकल्प, पर्यावरणपूरक इमारती आणि आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट यावर सखोल चर्चा झाली.
काही माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या सिव्हिल विभागातील विद्यार्थ्यांना औद्योगिक ट्रेनिंग, प्रकल्प भेटी, मार्गदर्शनासाठी व्याख्याने आणि संशोधन प्रकल्पांसाठी मार्गदर्शन देण्याचे आश्वासन दिले. तसेच गरजू विद्यार्थ्यांसाठी नोकरी आणि इंटरनशिप संधी उपलब्ध करून देण्याचे माजी विद्यार्थ्यांनी मान्य केले.
प्राचार्य डॉ. एस. बी. लांडे यांनी स्थापत्य अभियांत्रिकी शाखेच्या माजी विद्यार्थ्यांच्या योगदानाबद्दल आवाहन केले होते. २०१३ बॅच माजी विद्यार्थी संमेलनासाठी आलेल्या सर्व १३ माजी विद्यार्थ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तसेच स्थापत्य अभियांत्रिकी शाखेचे विभाग प्रमुख डॉ. एन. टी. सुर्यवंशी यांनी विभागाच्या प्रगतीबद्दल आणि सद्य परिस्थितीत चालू असणारे चांगले उपक्रम तसेच भविष्यातील योजनांविषयी माहिती दिली, विद्यार्थ्यांना विभागाच्या विकासासाठी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले व भविष्यातील संधींचा लाभ घेण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा सल्ला दिला.
माजी विद्यार्थी समन्वयक प्रा. दिलीप गुलाबराव पाटील यांनी माजी विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रेरित केले. माजी विद्यार्थी आणि फॅकल्टी प्रा. उमेश जगदाळे यांनी आपल्या अनुभवाच्या आधारे विद्यार्थ्यांना सिव्हिल क्षेत्रातील बदलत्या ट्रेंड्स आणि संधींबाबत मार्गदर्शन केले. IIIC समन्वयक प्रा. पल्लवी बोके यांनी औद्योगिक संस्थांशी संलग्न राहून विद्यार्थ्यांना इंडस्ट्री-एकेडेमिया कोलॅबोरेशनच्या संधी कशा मिळवता येतील, यावर प्रकाश टाकला.
त्यांनी इंडस्ट्री पार्टनरशिप वाढवण्यासाठी मोलाचे कार्य केले. संमेलनाच्या शेवटी सर्वांनी एकत्रित अल्पोपहार आणि चहापाना आनंद घेतला आणि पुढील वर्षी आणखी मोठ्या प्रमाणात भेटण्याचा निर्धार केला.