शैक्षणिक

विद्या प्रतिष्ठानच्या इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, बारामती येथे “शोध कल्पनेपासून प्रभावापर्यंत : शास्त्रीय प्रकाशनावरील सर्वसमावेशक कार्यशाळा” संपन्न.

शंका विचारून समाधान

विद्या प्रतिष्ठानच्या इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, बारामती येथे “शोध कल्पनेपासून प्रभावापर्यंत : शास्त्रीय प्रकाशनावरील सर्वसमावेशक कार्यशाळा” संपन्न.

शंका विचारून समाधान

बारामती वार्तापत्र

विद्या प्रतिष्ठानच्या इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, बारामती येथे “शोध कल्पनेपासून प्रभावापर्यंत : शास्त्रीय प्रकाशनावरील सर्वसमावेशक कार्यशाळा” या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा बुधवार दि. ३० जुलै २०२५ रोजी यशस्वीरित्या पार पडली.

ही कार्यशाळा विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना आणि संशोधकांना संशोधन प्रकाशनाच्या संपूर्ण प्रवासाची सखोल समज देण्यासाठी आयोजित करण्यात आली होती — संशोधन कल्पना सुचवण्यापासून ते प्रभावीपणे त्या प्रकाशित करून शैक्षणिक जगतात प्रभाव निर्माण करण्यापर्यंतचे मार्गदर्शन करण्यात आले.

डॉ. प्रकाश सिंग, सहयोगी प्राध्यापक, ई-कॉमर्स विभाग, कॉलेज ऑफ अॅडमिनिस्ट्रेटिव्ह अँड फायनान्शियल सायन्सेस, सौदी इलेक्ट्रॉनिक युनिव्हर्सिटी, सौदी अरेबिया व डॉ. लोकेश अरोरा , प्राध्यापक, विपणन विभाग, डॉ. डी. वाय. पाटील बी-स्कूल, पुणे हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते.

कार्यशाळेच्या पहिल्या सत्रामध्ये डॉ. लोकेश अरोरा मॅडम यांनी संशोधनाच्या मूलभूत संकल्पनांचे सविस्तर स्पष्टीकरण दिले.

त्यांनी प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून क्लिष्ट संकल्पना सहज आणि समजण्यासारख्या करून दिल्या. त्यांच्या सत्रातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे योग्य संशोधन शीर्षक कसे निवडावे याबाबतचे मार्गदर्शन, जे संशोधन प्रक्रियेच्या मूलभूत तत्त्वांशी सुसंगत असावे, यावर त्यांनी विशेष भर दिला.

कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रामध्ये, डॉ. प्रकाश सिंग यांनी संशोधन समस्या ओळखणे, प्रभावी गृहितक तयार करणे, संशोधन रचना (डिझाईन) समजून घेणे आणि डेटा संकलनाच्या व्यावहारिक पद्धती शिकणे तसेच प्रभावी लेखन, जर्नल निवड, आणि पीअर-रिव्ह्यू प्रक्रिया यांसारख्या विषयांवर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.

त्यांच्या सत्रांनंतर झालेल्या प्रश्नोत्तर सत्रात सहभागी संशोधकांनी आपल्या शंका विचारून समाधान मिळवले.
ही कार्यशाळा विद्या प्रतिष्ठानच्या इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, बारामती संस्थेच्या संशोधन व उत्कृष्टतेच्या दृष्टीकोनाची साक्ष देते आणि भविष्यातील संशोधकांमध्ये प्रेरणा निर्माण करणारी ठरली.

सदर कार्यशाळा आयोजित करण्यासाठी संस्थेचे संचालक डॉ. आनंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. युवराज नलवडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

सदर कार्यशाळा आयोजित करण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त सौ. सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष अॅड. अशोक प्रभुणे, सचिव अॅड. नीलिमा गुजर, खजिनदार युगेंद्र पवार, डॉ. राजीव शहा, श्री. किरण गुजर, श्री. मंदार सिकची व रजिस्ट्रार श्रीश कंबोज यांचे प्रोत्साहन लाभले.

Related Articles

Back to top button