विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात आयआयटी बॉम्बेच्या ‘Spoken Tutorial’ कार्यशाळेचे यशस्वी आयोजन
२३० विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ

विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात आयआयटी बॉम्बेच्या ‘Spoken Tutorial’ कार्यशाळेचे यशस्वी आयोजन
२३० विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ
बारामती वार्तापत्र
विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील बी.बी.ए (सी.ए.) विभागाच्या वतीने आय.आय.टी. बॉम्बे संलग्न स्पोकन टीटोरिअल कार्यशाळा आयोजित केली होती.
महाविद्यालयातील बी. बी. ए. (सी. ए.), बी.ए.स्सी (कॉम्पुटर) या विभागातील २३० विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.
कार्यशाळेच्या अंतर्गत एच.टी.एम.ल,आर.डी.बी.एम.एस,पी.एच.पी आणि माय.एस.क्यूए.ल या कोर्सचे आयोजन करण्यात आले.
केंद्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या ‘नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आयसीटी’ (NMEICT) अंतर्गत येणाऱ्या या प्रकल्पाचा उद्देश विद्यार्थ्यांना मुक्त आणि ओपन सोर्स सॉफ्टवेअर (FOSS) चे प्रभावी प्रशिक्षण देणे हा आहे. स्पोकन ट्युटोरियल कोर्स हे स्वयं-अभ्यासासाठी उपयुक्त असून, विद्यार्थी आपल्या सोयीनुसार, कुठूनही आणि कधीही शिकू शकतात.
ही कार्यशाळा विद्यार्थ्यांना वेब डेव्हलपमेंटमधील (Web Development) मूलभूत आणि प्रगत कौशल्ये आत्मसात करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरली.
या कार्यक्रमाने सहभागींना डेटाबेस व्यवस्थापन प्रणाली (RDBMS), वेबपेज रचना (HTML) आणि डायनॅमिक वेबसाइट निर्मितीसाठी (PHP & MySQL) आवश्यक असणाऱ्या ओपन सोर्स तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिकासह माहिती दिली.
आयआयटी बॉम्बेच्या ‘Spoken Tutorial’ पद्धतीमुळे, डिजिटल इंडिया उपक्रमाला चालना देत विद्यार्थ्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम बनविण्यात महाविद्यालयाला यश आले.
आजच्या डिजिटल युगात महत्त्वपूर्ण कौशल्ये आत्मसात करण्याची संधी या कार्यशाळेतून उपलब्ध झाली, ज्यामुळे विद्यार्थी उद्योग क्षेत्रात अधिक स्पर्धात्मक बनू शकतील.
या कार्यशाळेचा विद्यार्थ्यांना भविष्यातील नोकरीच्या संधींसाठी निश्चितच उपयोग होईल, असे प्रतिपादन विभागप्रमुख महेश पवार यांनी केले.
आयआयटी बॉम्बेच्या या कार्यशाळेमुळे विद्यार्थांना र्डिजिटल युगासाठी आवश्यक असलेली तांत्रिक कौशल्ये आत्मसात करता आली, ज्यामुळे त्यांची रोजगारक्षमता आणि शैक्षणिक गुणवत्ता निश्चितच वाढेल, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी केले.
कार्यशाळेत सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ. शामराव घाडगे, उपप्राचार्य डॉ. लालसाहेब काशीद, आय.क्यू.ए.सी. समन्वयक प्रा. नीलिमा पेंढारकर, विभागप्रमुख प्रा. महेश पवार आणि विभागातील प्राध्यापक यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
या कार्यशाळेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ. शामराव घाडगे, उपप्राचार्य डॉ. लालासाहेब काशीद, आय.क्यू. ए. सी. समन्वयक प्रा. नीलिमा पेंढारकर, विभागप्रमुख प्रा. महेश पवार, स्पोकन टीटोरिअल आय आय टी बॉम्बे महाराष्ट्राचे समन्वयक विद्या कदम यांचे मार्गदर्शन लाभले.या कार्यशाळेसाठी अनिल काळोखे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.
हि कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी विभागातील विशाल शिंदे, पूनम गुंजवटे, अक्षय भोसले, अक्षय शिंदे, कांचन खिरे, वैशाली पेंढारकर, शुभांगी निकम, सतीश चौधर यांचे सहकार्य लाभले .