विद्या प्रतिष्ठानच्या पूल कॅम्पस ड्राइव्हमध्ये १९ विद्यार्थी निवड
आदाणी सिमेंट आणि सुरोज बिल्डकॉन या प्रतिष्ठित कंपन्यांनी दिल्या नोकरीच्या संधी

विद्या प्रतिष्ठानच्या पूल कॅम्पस ड्राइव्हमध्ये १९ विद्यार्थी निवड
आदाणी सिमेंट आणि सुरोज बिल्डकॉन या प्रतिष्ठित कंपन्यांनी दिल्या नोकरीच्या संधी
बारामती वार्तापत्र
पुणे ग्रामीण भागातील एकमेव स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय असलेल्या विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इंस्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती येथे आयोजित पूल कॅम्पस ड्राइव्हमध्ये आदाणी सिमेंट आणि सुरोज बिल्डकॉन या प्रमुख कंपन्यांनी विद्या प्रतिष्ठानच्या १९ विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी दिल्या आहेत.
शैक्षणिक उत्कृष्टता आणि उत्तम प्लेसमेंटसाठी ओळखल्या जाणाऱ्या या संस्थेने पुन्हा एकदा स्वतःची प्रतिष्ठा सिद्ध केली आहे. ‘ए+’ नॅक ग्रेडिंग आणि तीन विभागांसाठी एनबीए मान्यताप्राप्त असलेले हे महाविद्यालय गेल्या काही वर्षांत उत्तम प्लेसमेंट रेकॉर्ड ठेवत आहे. महत्त्वाचे म्हणजे, संस्था केवळ स्वतःच्या विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर परिसरातील इतर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीही नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने कार्यरत आहे.
सहभागी अभियांत्रिकी महाविद्यालये: एसव्हीपीएम माळेगाव, एसव्हीईआरआय पंढरपूर, व्हीपी पॉलिटेक्निक इंदापूर, एसबी पाटील इंदापूर, केबीपी सातारा, परिक्रमा पॉलिटेक्निक काष्टी
विद्या प्रतिष्ठान अभियांत्रिकी महाविद्यालय वैशिष्ट्य:
पुणे ग्रामीण भागातील एकमेव स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय
‘ए+’ नॅक ग्रेडिंग
तीन विभागांना एनबीए मान्यता
उच्च प्लेसमेंट रेकॉर्ड
शैक्षणिक उत्कृष्टता
कॅम्पस ड्राईव्हमध्ये निवडलेले विद्यार्थी:
आदाणी सिमेंट: स्वराज राठोड – सिव्हिल, विपुल शाहा – सिव्हिल, अथर्व सनगर – मेकॅनिकल, जुंदळे मल्लिकार्जुन – सिव्हिल, ओम शिंदे – मेकॅनिकल, रोहन गावडे – इलेक्ट्रिकल, हितेश पवार – सिव्हिल, प्रणव शेडगे – मेकॅनिकल, अभिराज निंबाळकर – सिव्हिल, रोहित जाधव – सिव्हिल, अणिकेत शिंदे – इलेक्ट्रिकल
कृष्णा पवार – इलेक्ट्रिकल, विश्वजीत नलवडे – इलेक्ट्रिकल, सिद्धेश रेनुसे – इलेक्ट्रिकल,
सुरोज बिल्डकॉन: हर्षवर्धन चौधरी – सिव्हिल, निलकंठ नाळे – सिव्हिल, अविराज धायगुडे – सिव्हिल आदित्य दासांगे – सिव्हिल, अजित दोर्गे – सिव्हिल संस्थेचे केंद्रीय टीपीओ डॉ. विशाल कोरे, महाविद्यालयाचे टीपीओ श्री. सुरज कुंभार, प्राचार्य डॉ. सुधीर लांडे आणि व्यवस्थापन समिती यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.