विद्या प्रतिष्ठानच्या महाविद्यालयातील बी.बी.ए.सी.ए.विभागातील विद्यार्थ्यास अकरा लाखाचे वार्षिक पॅकेज….
11 लाख रुपये वार्षिक पगाराचे
![](https://baramatiwarta.in/wp-content/uploads/2025/01/IMG-20250115-WA0063-780x470.jpg)
विद्या प्रतिष्ठानच्या महाविद्यालयातील बी.बी.ए.सी.ए.विभागातील विद्यार्थ्यास अकरा लाखाचे वार्षिक पॅकेज….
11 लाख रुपये वार्षिक पगाराचे
बारामती वार्तापत्र
विद्या प्रतिष्ठानचे कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मधील बी.बी.ए.(सीए) विभागातील तृतीय वर्षांमधील विद्यार्थी रितेश रमेश धापटे या विद्यार्थ्यांची पदवी पूर्ण होण्याच्या आधीच डायनासॉफ्ट अप्लाइड सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड,पुणे या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर या पदी निवड झाली आहे.
त्यास 11 लाख रुपये वार्षिक पगाराचे पॅकेज मिळाले आहे.
प्राचार्य डॉ.भरत शिंदे सर , उपप्राचार्य डॉ.शामराव घाडगे , उपप्राचार्य डॉ.लालासाहेब काशीद व विभाग प्रमुख महेश पवार , संगणक शास्त्र विभाग प्रमुख गजानन जोशी, ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर विशाल कोरे, विद्या प्रतिष्ठान संस्थेचे विश्वस्त व कार्यकारी मंडळाचे सर्व सदस्य तसेच प्राध्यापक, कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे. बी.बी.ए.(सी.ए.)विभागातील विशाल शिंदे ,अनिल काळोखे ,पुनम गुंजवटे ,अक्षय भोसले , वैशाली पेंढारकर ,शुभांगी निकम, अक्षय शिंदे , कांचन खिरे यांनी या विद्यार्थ्याला मार्गदर्शन केले.