विद्या प्रतिष्ठानच्या महाविद्यालयामध्ये क्विक हील फाउंडेशनच्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ उपक्रमांतर्गत बक्षीस वितरण सोहळा साजरा
‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’

विद्या प्रतिष्ठानच्या महाविद्यालयामध्ये क्विक हील फाउंडेशनच्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ उपक्रमांतर्गत बक्षीस वितरण सोहळा साजरा
‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’
बारामती वार्तापत्र
विद्या प्रतिष्ठानच्या कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये बी बी ए सी ए विभाग अंतर्गत क्विक हील फाउंडेशनच्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ उपक्रमांतर्गत बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी उपक्रमादरम्यान केलेल्या उत्कृष्ट कार्याचा आढावा घेण्यात आला आणि त्यांच्या मेहनतीची दखल घेत सन्मानचिन्ह व बक्षिसांद्वारे त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे बी बी ए सी ए विभागप्रमुख महेश पवार, बीसीए विभागप्रमुख ढाणे, उपस्थित होते.
कार्यक्रमची प्रस्तावना बीबीएसीए विभागप्रमुख महेश पवार यानी केली व या उपक्रमाचे समन्वयक अक्षय भोसले यांनी विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेबाबत समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.
विद्यार्थ्यांनी सायबर गुन्हे, डेटा सुरक्षितता, ऑनलाईन फसवणूक आणि सायबर सुरक्षा उपाययोजनांवर विविध उपक्रम राबवले. त्यांच्या संशोधनात्मक आणि जनजागृतीपर कामगिरीची दखल घेत, विशेष सन्मानपत्रे आणि बक्षिसे प्रदान करण्यात आली.
प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले की,”सायबर सुरक्षेच्या या युगात तरुणांनी केवळ स्वतःच नाही तर संपूर्ण समाजाला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी घ्यायला हवी.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानी चेडे, सागर मेरावी, प्रांजल मडकर आणि भाग्यश्री खैरे यांनी केले, तर विशाल शिंदे यांनी कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शन केले.
या सोहळ्यात बेस्ट प्रोसेस कंप्लायन्स पुरस्कार भाग्यश्री खैरे आणि प्रांजल मडकर यांना प्रदान करण्यात आला, तर शिवानी चेडे आणि विनया लखे यांनी रणरअप म्हणून स्थान मिळवले. सर्वोच्च ऑफलाईन पोहोच साठी सागर मेरावी यांना सन्मानित करण्यात आले, तर यश साळवे आणि महेश कांदेकर यांनी रणरअप म्हणून कामगिरी केली. सर्वोच्च ऑनलाईन पोहोच साठी गीतांजली गावटे आणि वैश्णवी तवर यांना पुरस्कार मिळाला, तर अत्तर सामिया आणि मंजिरी चौधरी यांनी रणरअप पुरस्कार पटकावला.
ऋतुजा काळसकर, पूजा भापकर, गीतांजली गावटे, वैश्णवी तौर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
विद्यार्थ्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला असून भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात हा उपक्रम राबवण्यात येईल, असेही मान्यवरांनी नमूद केले. अनिल काळोखे, पूनम गुंजवटे ,वैशाली पेंढारकर ,शुभांगी निकम ,अक्षय शिंदे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले