विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय एकात्मता शिबिरामध्ये सहभाग
एकूण २०० स्वयंसेवक सहभागी
विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय एकात्मता शिबिरामध्ये सहभाग
एकूण २०० स्वयंसेवक सहभागी
बारामती वार्तापत्र
विद्या प्रतिष्ठानचे कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय बारामतीमधील जयदीप धगाटे आणि डॉ. अनंत शेरखाने यांचा “राष्ट्रीय एकात्मता शिबीरात” (NIC) सहभाग साठी निवड झाली होती
दि. ०६ ते १२ नोव्हेंबर २०२४ या कालावधीमध्ये राष्ट्रीय एकात्मता शिबीर बी.आर.सी.एम लॉं कॉलेज भिवानी (बंशी लाल यूनिवर्सिटी भिवानी) हरियाणा येथे झालेल्या कॅम्प मध्ये विद्या प्रतिष्ठानचे कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय बारामतीमधील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक कु. जयदीप धगाटे व कार्यक्रम अधिकारी डॉ अनंत शेरखाने यांना महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.
या शिबिरासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी मधून विविध महाविद्यालयामधून ०५ राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये महाविद्यालयातील स्वयंसेवक कु. जयदीप धगाटे याची निवड करण्यात आली होती.
राष्ट्रीय एकात्मता शिबिरासाठी थीम होती माझ्या भारतासाठी युवक आणि डिजिटल साक्षरतेसाठी युवक” राष्ट्रीय एकात्मता शिबिरांचे उद्दिष्ट देशातील तरुणांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढवणे, विद्यार्थ्यांना विविध प्रदेश, भाषा, धर्म आणि संस्कृतीतील लोकांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देणे आणि देशभक्ती, सामाजिक जबाबदारी आणि नागरी जागृतीची भावना विकसित करणे हा आहे.
या ७ दिवसांच्या शिबिरामध्ये होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमातून स्वयंसेवकांना आपल्या राज्याची संस्कृती राष्ट्रीय पातळीवर सादर करण्याची संधी मिळाली तसेच विविध राज्यांची संस्कृती समजून घेता आली. या शिबिरात विविध राज्यांतील एकूण २०० स्वयंसेवक सहभागी आणि १३ कार्यक्रम अधिकारी सहभागी झाले होते.
सदर शिबिरात सहभागी होण्यासाठी यांना महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांतकुमार पाटील, संचालक राष्ट्रीय सेवा योजना तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ महावीरसिंह चौहान, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ सुमन देवरुमठ, महाविद्यालयातील सर्व शिक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.