शैक्षणिक

विद्या प्रतिष्ठानच्या व्हीआयआयटी महाविद्यालयातील एमबीए आणि एमसीएच्या १८ विद्यार्थ्यांची ऑन कॅम्पस ड्राईव्ह द्वारे नोकरीसाठी निवड.

एमसीए मधून पाच विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड

विद्या प्रतिष्ठानच्या व्हीआयआयटी महाविद्यालयातील एमबीए आणि एमसीएच्या १८ विद्यार्थ्यांची ऑन कॅम्पस ड्राईव्ह द्वारे नोकरीसाठी निवड.

एमसीए मधून पाच विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड

बारामती वार्तापत्र

विद्या प्रतिष्ठान बारामती,विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उच्च दर्जाच्या नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असते.विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी महाविद्यालयातील वर्षभर विविध प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन केले जाते अशी माहिती विद्या प्रतिष्ठानचे ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ.विशाल कोरे यांनी दिली.

अलीकडेच विद्या प्रतिष्ठानच्या इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (व्हीआयआयटी) कॅम्पस ड्राईव्ह द्वारे इन्फोसिस लिमिटेड,कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोल्यूशन्स कॉर्पोरेशन आणि एचडीएफसी- लाईफ या नामांकित कंपनी मध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे.

नोकरीसाठी निवड झालेल्या एमबीए विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे – प्रणाली जाधव,मुक्ता पवार,कार्तिकी शेंडे,सानिका जाधव,समृद्धी राऊत,सुशांत कुलकर्णी,तस्किम मुलानी,मित्तल सुराणा,सुरज फाळके,आकाश अदलिंग,ओंकार यादव,रोहन शिंदे आणि मुस्कान मंगल मोंगल या विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड झाल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली.

तसेच एमसीए मधून पाच विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड झालेली आहे त्यांची नावे पुढील प्रमाणे – दिपाली शेळके,जुवेरिया बागवान,ओमकार पाटील,संकेत झगडे आणि रोहन लोंढे.

या कामी विद्या प्रतिष्ठानचे ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ.विशाल कोरे,व्हीआयआयटी चे संचालक मा.श्री.डॉ.आनंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, व्हीआयआयटी च्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे समन्वयक प्रा.संदीप भोपळे व प्रा.प्रविण बागल यांनी परिश्रम घेतले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या विश्वस्त सौ.सुनेत्रा पवार,उपाध्यक्ष ॲड.अशोक प्रभुणे,सेक्रेटरी ॲड.नीलिमा गुजर ,खजिनदार युगेंद्र पवार,डॉ.राजीव शहा,किरण गुजर,मंदार सिकची आणि मॅनेजमेंट काउन्सिल चे सर्व सदस्य रजिस्टार श्रीश कंबोज, पालक व संस्थेतील सर्व कर्मचारी यांच्याकडून विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक व अभिनंदन होत आहे.

Back to top button