विद्या प्रतिष्ठानच्या 16 विद्यार्थ्यांची भारत फोर्जमध्ये निवड
विद्यार्थ्यांच्या मेहनतीमुळे आज त्यांना भारत फोर्जमध्ये संधी
विद्या प्रतिष्ठानच्या 16 विद्यार्थ्यांची भारत फोर्जमध्ये निवड
विद्यार्थ्यांच्या मेहनतीमुळे आज त्यांना भारत फोर्जमध्ये संधी
बारामती वार्तापत्र
विद्या प्रतिष्ठानच्या कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयातील 2025 बॅचमधील 16 विद्यार्थ्यांची भारत फोर्ज कंपनीत निवड झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ₹3 लाख वार्षिक पॅकेज मिळणार आहे.
निवड झालेले विद्यार्थी: बीई इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन: महेश मुळे, ओंकार होळकर, ओंकार मांढरे बीई मेकॅनिकल: पुष्कराज जाधव, ऋषिकेश मुसळे, अभय पानसरे, सौरभ शिंदे, प्रतीक शिंदे, सागर घाडगे, वैभव ढोणे बीई इलेक्ट्रिकल: अभिजीत पवार, रोशन शिंदे, रोहन वाबळे, अजय भोसले, आदित्य तपकिरे, शुभम बोरकर आदी सर्व . विद्यार्थ्यांच्या या निवडी करता सेंट्रल टीपीओ डॉ. विशाल कोरे, महाविद्यालयाचे टीपीओ श्री. सुरज कुंभार, प्रभारी प्राचार्य डॉ. सुधीर लांडे, विभाग समन्वयक श्री. मयूर गावडे, श्री. शिवाजी रासकर यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.
विद्यार्थ्यांच्या मेहनतीमुळे आज त्यांना भारत फोर्जमध्ये संधी मिळाली आहे हे महाविद्यालयासाठी अभिमानाचे आहे,” असे गौरव उद्गार प्रभारी प्राचार्य डॉ. लांडे यांनी काढले. संस्थेच्या व्यवस्थापन सदस्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या भविष्यातील कारकिर्दीसाठी व वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.