विद्या प्रतिष्ठानमध्ये “जनरेटिव्ह एआय विथ यूआय/यूएक्स डिझाइन” प्रशिक्षण संपन्न
उत्कृष्ट प्रकल्प सादर करणाऱ्या सात विद्यार्थ्यांच्या संघाची निवड करण्यात आली

विद्या प्रतिष्ठानमध्ये “जनरेटिव्ह एआय विथ यूआय/यूएक्स डिझाइन” प्रशिक्षण संपन्न
उत्कृष्ट प्रकल्प सादर करणाऱ्या सात विद्यार्थ्यांच्या संघाची निवड करण्यात आली
बारामती वार्तापत्र
विद्या प्रतिष्ठानच्या शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांच्या वतीने “जनरेटिव्ह एआय विथ यूआय/यूएक्स डिझाइन” या विषयावरील एक आठवड्याचे कौशल्य विकास प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
या प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना आधुनिक यूआय/यूएक्स डिझाइन तत्त्वे, उद्योगाभिमुख डिझाइन कार्यपद्धती तसेच डिझाइन प्रक्रियेत जनरेटिव्ह एआय साधनांचा प्रभावी वापर यांची माहिती देण्यात आली.
डिझाईनव्हियो प्रा. लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिकेत पवार व मुख्य तांत्रिक अधिकारी सौ. निलम किर्दत यांनी संपूर्ण कार्यक्रमादरम्यान उद्योगाभिमुख ज्ञान, व्यावहारिक दृष्टिकोन आणि प्रत्यक्ष प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना मौल्यवान मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांनी एआय साधनांचा वापर करून विविध प्रॉब्लेम स्टेटमेंट्सवर आधारित यूआय/यूएक्स प्रकल्प विकसित केले. उत्कृष्ट प्रकल्प सादर करणाऱ्या सात विद्यार्थ्यांच्या संघाची निवड करण्यात आली असून त्यांना डिझाईनव्हियो प्रा. लि. येथे इंटर्नशिपची संधी मिळाली आहे.
या उपक्रमाच्या आयोजनासाठी विद्या प्रतिष्ठानच्या व्यवस्थापन मंडळाचे दूरदर्शी नेतृत्व, मार्गदर्शन व सहकार्य लाभले. संगणक अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख डॉ. अरविंद जगताप यांचे सहकार्य लाभले.
अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमाचे समन्वयन सौ. निशा जगदाळे व कु. गौरी भेलोंडे यांनी केले.






