विद्या प्रतिष्ठान अभियांत्रिकी महाविद्यालयात इंटर्नशिप वरील वेबिनार संपन्न
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी हे सत्र अतिशय उपयुक्त ठरले.
विद्या प्रतिष्ठान अभियांत्रिकी महाविद्यालयात इंटर्नशिप वरील वेबिनार संपन्न
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी हे सत्र अतिशय उपयुक्त ठरले.
बारामती वार्तापत्र
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालय प्लेसमेंट, कौशल्य विकास, बौद्धिक मालमत्ता अधिकार, पेटंट, उद्योजकता व इनक्युबेशन या बाबींवर विशेष परिश्रम घेत असते. नुकतेच उद्योग-महाविद्यालय सुसंवाद कक्ष, राष्ट्रीय सेवा योजना व बारामती उद्योग समुह यांच्या संयुक्त विद्यमाने झूम या प्रणालीवर ऑनलाईन पद्धतीने एआयसीटीईचे पदाधिकारी मा. बुद्ध चंद्रशेखर यांचे ‘विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप व जॉब संधी’ या विषयावर व्याख्यान पार पडले. या व्याख्यानादरम्यान नोकरी व उद्योजकता या क्षेत्रातील अनेक संधी तसेच ऑनलाइन उपलब्ध असलेल्या अनेक विनामूल्य पुरक अभ्यासक्रमांचा उहापोह करण्यात आला. उपस्थितांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी हे सत्र अतिशय उपयुक्त ठरले.
कु. सिद्धी पोपडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर कु. श्रेया कदम यांनी आभार प्रदर्शन केले. सूत्रसंचालनाची धुरा श्री. रोहित गांधी व कु. वैष्णवी धुमाळ यांनी वाहिली. तांत्रिक विभागाची धुरा श्री. श्रेयस कुलथे यांनी सांभाळली.
संस्थेचे उपाध्यक्ष अॅड अशोक प्रभुणे, विश्वस्त सौ सुनेत्रा पवार, अॅड नीलिमा गुजर, प्राचार्य डॉ. राजनकुमार बिचकर यांच्या मार्गदर्शनात उद्योग-महाविद्यालय सुसंवाद कक्ष अधिष्ठाता डॉ. दिनेश हंचाटे, समन्वयक प्रा. अनिल डिसले, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. दीपक सोनवणे यांनी हा वेबिनार यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.