विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निकचा ऑटो एक्स्पो आणि प्रकल्प प्रदर्शन”
एकूण १५ प्रकल्प प्रदर्शित
विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निकचा ऑटो एक्स्पो आणि प्रकल्प प्रदर्शन”
एकूण १५ प्रकल्प प्रदर्शित
इंदापूर प्रतिनिधी –
इंदापूर येथील विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेजने ३१ जानेवारी २०२५ रोजी कॉलेजच्या सर्व विभागातील विविध नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रकल्प प्रदर्शनाचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुजय देशपांडे यांचं हस्ते करण्यात आले.
मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग विभागांनी आयोजित केलेला ऑटो एक्स्पो हे प्रदर्शनाचा एक प्रमुख आकर्षण होते. त्यात इंदापूरमधील महालक्ष्मी ऑटोमोटिव्ह प्रा. लि., भरणे मोटर्स आणि सोनाई बजाज यासारख्या प्रमुख स्थानिक ऑटोमोटिव्ह कंपन्यांचे नवीनतम वाहन मॉडेल्स सादर करण्यात आले. या प्रकल्प प्रदर्शनात एकूण १५ प्रकल्प प्रदर्शित करण्यात आले, ज्यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील ५, ऑटोमोबाईल विभागातील ४ आणि यांत्रिक अभियांत्रिकी विभागातील ६ प्रकल्प होते. परीक्षक म्हणून आकाश गायकवाड यांनी काम पहिले. ऑटोमोबाईल विभागाचे विभाग प्रमुख प्रा.सुनील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे ऑटो एक्स्पो प्रदर्शन भरविण्यात आले होते.
इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विभागाकडून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन (EESA) आणि ISTE स्टुडंट चॅप्टर MH323 यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. स्पर्धेत एकूण ८ प्रकल्प गटांनी भाग घेतला, ज्यामध्ये तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी तांत्रिकदृष्ट्या प्रकल्प सादर केले. उल्लेखनीय प्रकल्पांमध्ये स्मार्ट डस्टबिन, होम ऑटोमेशन सिस्टम आणि अर्डिनोवर आधारित फायर सेन्सर यांचा समावेश होता. व्हीपीसीएससी इंदापूर येथील सहाय्यक प्रा. श्रीमती खारतोडे श्वेता प्रदीप यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञ पॅनेलने या प्रकल्पांचे मूल्यांकन केले.
संगणक विभागाकडून विद्यार्थ्यांनी एकूण २२ प्रकल्प प्रदर्शित केले.ज्यामध्ये स्मार्ट स्ट्रीट लाईट सिस्टम, साईन लँग्वेज डिटेक्टर युजिंग एम. एल.,कॉलेज कनेक्ट अॅप, व्हिडिओमध्ये ऑब्जेक्ट डिटेक्शन आणि ट्रॅकिंग एआय आधारित प्रेडिक्टिव मेंटेनन्स सिस्टम रिअलटाइम वेब मॉनिटरिंगसह स्मार्ट आरएफआयडी आधारित उपस्थिती इत्यादी प्रकल्पांचा समावेश आहे. परीक्षक म्हणून प्रा. मनस्वी वैराट आणि प्रा. एस टी. ननवरे यांनी काम पहिले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . सुजय देशपांडे , सर्व विभागाचे विभाग प्रमुख , अधिव्याख्याता विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रदर्शनातील प्रभावी काम पाहण्यासाठी कार्यक्रमात उपस्थित होते.
या प्रदर्शनास विद्या प्रतिष्ठान इंदापूर इंग्लिश मेडीयम स्कूल , या शाळेच्या शिक्षिका सौ . कापसे मॅडम यांनी १०० विद्यार्थ्यांसह भेट दिली . तसेच सौ कुस्तुरबाई विद्यालय, इंदापूर या शाळेच्या एकूण ३५० विद्यार्थांनी आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, इंदापूर, चे प्राचार्य श्री शिंगारे सर, यांनी ५० विद्यार्थ्यांसह प्रदर्शनाला भेट दिली.
हे प्रकल्प प्रदर्शन यशस्वी होण्याकरिता महाविद्यालयातील प्रा. सुनील शिंदे , प्रा . दिनेश सावंत , प्रा सदानंद भुसे, प्रा सोमनाथ चिकणे प्रा . महेश कुलकर्णी प्रा .मयूर सुपेकर , प्रा योगेश जाधव तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.