स्थानिक

विद्या प्रतिष्ठान मध्ये राष्ट्रीय बौद्धिक संपदा जागरुकता अभियान संपन्न

काँपीराईट कायद्याचे उल्लंघन केल्यावर मिळणारी शिक्षा काय आहे?

विद्या प्रतिष्ठान मध्ये राष्ट्रीय बौद्धिक संपदा जागरुकता अभियान संपन्न

काँपीराईट कायद्याचे उल्लंघन केल्यावर मिळणारी शिक्षा काय आहे?

बारामती वार्तापत्र

विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय बारामती व विद्या प्रतिष्ठानचे वसंतराव पवार विधी महाविद्यालय बारामती आणि भारत सरकारचे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, पेटंट, डिझाईन आणि ट्रेडमार्कचे नियंत्रक जनरलचे डीपीआयआयटी कार्यालय (राष्ट्रीय बौद्धिक संपदा जागरूकता अभियानांतर्गत) यांच्या सयुक्त विद्यमाने ०९/०५/२०२२ रोजी महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉल मध्ये सकाळी ठीक ११.०० वाजता “पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट, जी आय या बाबत जागृता” या विषयावर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. डॉ. श्री. विजय ओक यांनी प्रमुख पाहुण्यांचा अल्पसा परिचय करून दिला. त्यानंतर अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. श्री रा. स. बिचकर व विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्री. अतुल शहाणे या दोघांच्या हस्ते प्रमुख पाहुणे मनोज सोमकुवार ( सहाय्यक नियंत्रक पेटंट आणि डिझाईन मुंबई) यांचा सत्कार करण्यात आला.

त्यानंतर प्रमुख अतिथीचे मार्गदर्शनपर भाषण झाले त्यांनी आपल्या भाषणात पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट, जी आय या संकल्पना नेमक्या काय आहेत पेटंट म्हणजे काय आहे? पेटंट कसे करावे? पेटंट करण्याची प्रक्रिया कशी असते? पेटंटचे प्रकार कोणते? पेटंटमुळे मिळणारे अधिकार कोणते? पेटंट करण्यासाठी किती खर्च लागतो? तसेच ट्रेडमार्क म्हणजे काय? त्याची नोंदणी कोठे व कशी केली जाते? त्याचे फायदे काय आहेत.

तसेच  काँपीराईट म्हणजे काय? काँपीराईट मालकाचे कोणकोणते अधिकार असतात? काँपीराईट कायद्याचे उल्लंघन होऊ नये म्हणुन आपण काय करावे?  काँपीराईट कायद्याचे फायदे कोणकोणते आहेत?  काँपीराईट कायद्याचे उल्लंघन केल्यावर मिळणारी शिक्षा काय आहे?  त्याच प्रमाणे जी. आय. (भौगोलिक संकेत) भारत सरकारने महत्वाचा कायदा २००१ मध्ये देशात लागू केला, त्याला भौगोलिक उपदर्शन कायदा म्हणजेच जी आय कायदा असे म्हटले जाते. जळगावची केळी, पैठणी साडी, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, नाशिकची द्राक्षं, सांगलीचे बेदाणे, वेंगुर्ला काजू, रत्नागिरीचं कोकम, कोल्हापूरचा गूळ, पुण्याचा आंबेमोहोर तांदूळ, सातारचे कंदी पेढे, लोणावळ्याची चिक्की, या सर्व अस्सल आपल्या महाराष्ट्रात विशिष्ट भौगोलिक परिस्थितीत तयार होणाऱ्या या पदार्थांना आणि वस्तूंना जीआय टॅग दिला जातो  त्या जीआय टॅगसाठी ऐतिहासिक आणि विज्ञाननिष्ठ पुरावे द्यावे लागतात.

महाराष्ट्राचा अभिमान असलेल्या अशा तब्बल २८ पदार्थ आणि वस्तूंना जीआय मानांकन मिळाले आहे याचा सखोल उहापोह त्यांनी आपल्या या चर्चा सत्रामध्ये केला. त्याच  प्रमाणे भारतात पेटंट करण्याकरिता तुम्ही भारत सरकारच्या “ऑफिस ऑफ कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट्स,

डिजाइन्स अँड ट्रेडमार्क्स” या कार्यालयामध्ये जाऊन आपले पेटंट करू शकता तसेच पेटंट करण्याकरिता पेटंटचे कार्यालय हे चेन्नई, मुंबई आणि दिल्ली येथे आहे परंतु पेटंटचे मुख्य कार्यालय हे कोलकाता येथे आहे अशी माहिती त्यांनी दिली. त्यांनी आपल्या माहितीचे संपूर्ण सादरीकरण हे प्रोजेक्टरच्या माध्यमातून छोट्याशा पडद्यावर सर्वाना समजेल अशा ओघवत्या भाषेत केले. त्यांनी या क्षेत्रात नोकरीच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत याची माहिती सर्व विद्यार्थ्यांना दिली.

या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा विद्यार्थ्यांमधून नवीन नवीन उदोजक निर्माण व्हावेत व उद्योगजतासाठी त्यांना लागणारे कायदेशीर ज्ञान माहिती करून देणे हा होता.

या कार्यक्रमासाठी वसंतराव पवार विधी महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग, तसेच सहाय्यक प्रा. श्री. दीपक सोनवणे. विद्युत विभागाचे सहाय्यक प्रा. श्री. हाफिज शेख, प्रसारमाध्यम कक्षाचे श्री. सुनिल भोसले हे उपस्थित होते.

आभार प्रदर्शन श्री. दीपक सोनवणे यांनी केले. या कार्यक्रमासाठी संस्थेच्या विश्वस्त सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष श्री. अशोक प्रभुणे, सचिव निलीमाताई गुजर, खजिनदार श्री. युगेंद्र पवार, विश्वस्त डॉ. श्री. राजीव शहा, श्री. मंदार सिकची, श्री. किरण गुजर, रजिस्टार श्री. श्रीश कंभोज या सर्वांचे मोलाचे व महत्वपूर्ण असे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. शेवटी वंदेमातरमने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!