विद्या प्रतिष्ठान मध्ये विद्याटेक 202५ राज्यस्तरीय अंतरमहाविद्यालय विविध स्पर्धा संपन्न
आनंद शोधला पाहिजे आणि तो आनंद आपल्या शैक्षणिक वाटचालीत कायम ठेवला पाहिजे

विद्या प्रतिष्ठान मध्ये विद्याटेक 202५ राज्यस्तरीय अंतरमहाविद्यालय विविध स्पर्धा संपन्न
आनंद शोधला पाहिजे आणि तो आनंद आपल्या शैक्षणिक वाटचालीत कायम ठेवला पाहिजे
बारामती वार्तापत्र
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानचे कला ,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे बीबीए(सीए) या विभागामार्फत राज्यस्तरीय अंतरमहाविद्यालय विविध स्पर्धा VidyaTech २०२५ चे दि.२१ फेब्रूवारी २०२५ रोजी आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत पुणे, नगर,सोलापूर ,सातारा इ. या जिल्ह्यामधून विविध महाविद्यालयातील बी. बी. ए. (सी. ए.), बी. सी. ए. (सायन्स ) आणि बी. एस. सी.(कॉम्पुटर सायन्स),बी कॉम (आय.टी.) विभागाचे एकूण 339 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत आपल्या विविध कौशल्यांचे सादरीकरण केले.
यामध्ये पोस्टर प्रेझेंटेशन, प्रोग्रामिंग वॉर, प्रोजेक्ट प्रेसेंटेशन आणि प्रश्नमंजुषा फेरी अश्या स्पर्धांचे आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी प्रा.सचिन महाजन,पद्मश्री वी.खे.पाटील ए.एस.सी कॉलेज,प्रवरानगर,प्रा.भास्कर रासकर,बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण, प्रा.विठ्ठल रूपनवर,मुधोजी कॉलेज,फलटण, प्रा.स्वप्नील जाधवराव व प्रा.मेघा काळे,वाघिरे महाविद्यालय सासवड व प्रा.प्रियांका वाघोले एकनाथ दिवेकर ए.एस.सी कॉलेज,वरवंड हे या स्पर्धेला परीक्षक म्हणून लाभले.
स्पर्धेच्याच दिवशी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
सदर स्पर्धेत पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये नमिरा सावर्डेकर,बी.कॉम(आय.टी.),बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण यांना प्रथम क्रमांक, तर बोराटे मोहिनी बी.सी.एस. मुधोजी कॉलेज,फलटण यांना द्वितीय क्रमांक, प्रतीक्षा चोरमले व मयुरी वाळूंज एस.वाय. बी.बी.ए(सीए),वि.पी.ए.एस.सी.कॉलेज बारामती यांना तृतीय क्रमांक यांना प्राप्त झाला तर
प्रोजेक्ट प्रेझेंटेशनमध्ये ऋतुजा संतोष डोंगरे व अनुष्का संतोष चोरगे, टी.वाय.बी.बी.ए(सीए),वि.पी.ए. एस.सी. कॉलेज बारामती यांना प्रथम क्रमांक,रोहन अशोक आटोळे,टी.सी.कॉलेज,बारामती यांना द्वितीय क्रमांक, ओमकार पवार व प्रणव ताकवणे टी.वाय.बी.बी.ए.(सी.ए.),वि.पी.ए.एस.सी.कॉलेज बारामती यांना तृतीय क्रमांक यांना प्राप्त झाले.
प्रोग्रामिंग वॉरमध्ये रोहन देयचौधरी, एफ.वाय.बी.एस.सी.(सी.ए.),वि.पी.ए.एस.सी.कॉलेज बारामती यांना प्रथम क्रमांक, जठार सुजल,टी.वाय.बी.सी.ए.(सी.ए.),वि.पी.ए.एस.सी.कॉलेज बारामती यांना द्वितीय क्रमांक, उदय सूर्यवंशी टी.वाय.बीसी.एस.वि.पी.ए.एस.सी.कॉलेज बारामती यांना तृतीय क्रमांक प्राप्त झाले.
प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाचे पायल शत्रुघ्न शितोळे,टी.वाय.बी.सी.ए.(सायन्स) वि.पी.ए. एस.सी.कॉलेज बारामती यांना प्रथम क्रमांक, करूना काळूराम रंधवे ,टी.वाय.बी.बी.ए.(सी. ए.) वि.पी.ए. एस.सी.कॉलेज बारामती यांना द्वितीय क्रमांक आणि जगताप श्रेया विजय ,टी.वाय.बी.बी.ए.(सी. ए.) वि.पी.ए. एस.सी.कॉलेज बारामती यांना तृतीय क्रमांक यांना प्राप्त झाले.
बक्षीस वितरण कार्यक्रमास महाविद्यालयाचे डॉ.विलास कर्डिले, प्राचार्य डॉ. भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ. लालासाहेब काशीद, उपप्राचार्य डॉ. घाडगे, विभाग प्रमुख महेश पवार. नीलिमा पेंढारकर, आय. क्यू. ए. सी. समन्वयक, गजानन जोशी, किशोर ढाणे, सर्व परीक्षक, प्राध्यापक आणि विध्यार्थी उपस्थित होते.
यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे श्री.हनुमंत पाटील, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रादेशिक मंडळ बारामती यांनी विद्यार्थ्यांनी आपल मन, मस्तक आणि मनगट तयार करायला हव याचा भविष्यातील असणाऱ्या करिअर संधी मिळवण्यासाठी उपयोग होईल अशी माहिती दिली व वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होऊन जिंकलो/ हरलोपेक्षा इतर कौशल्यांचाही विकास करण्यास मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.भरत शिंदे यांनी स्पर्धेचे, स्पर्धकांचे आणि आयोजक बी.बी. ए.(सीए) विभागाचे कौतुक केले. सर्व स्पर्धकानी आपल्या सहभागामधील आनंद शोधला पाहिजे आणि तो आनंद आपल्या शैक्षणिक वाटचालीत कायम ठेवला पाहिजे अश्या शब्दात प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
प्रा.विशाल शिंदे, कार्यशाळा समन्वयक यांनी त्यांच्या प्रास्ताविकात विभागामार्फत होणाऱ्या वेगवेगळ्या विध्यार्थीपूरक उपक्रमाची माहिती दिली.
बक्षीस वितरण कार्यक्रमात प्रमुख अतिथी डॉ.विलास कर्डीले ,जिल्हा समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे,तुळजाराम चतुरचंद कॉलेज,बारामती यांनी अश्या स्पर्धांचे विद्यार्थ्यांना स्पर्धा या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये मध्ये कश्या प्रकारे उपयोगी ठरते याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.
ओम निंबाळकर, यश पानसरे व माही दोशी मुधोजी कॉलेज,फलटण,रोहन देयचौधरी, उदय सूर्यवंशी व पायल शितोळे,वि.पी.ए.एस.सी.कॉलेज बारामती,जॉय कटटू, बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण या विद्यार्थ्यांनी स्पर्धेचा अनुभव सांगत खूप काही शिकायला मिळाले, आत्मविश्वास वाढला अश्या शब्दात आपले मनोगत व्यक्त केले.
या स्पर्धेला विद्या प्रतिष्टान संस्थेच्या विश्वस्त सौ. सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, खजिनदार उगेंद्र पवार, सचिव .ॲड .नीलिमा गुजर, डॉ. राजीव शाह,श्री.किरण गुजर, श्री मंदार चिकाची,रजिस्ट्रार श्री. कंबोज तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भरत शिंदे व उप-प्राचार्य डॉ.शामराव घाडगे व उप-प्राचार्य लालासो काशीद यांचे सहकार्य लाभले.
सदर स्पर्धेचे सूत्रसंचालन पूनम गुंजवटे यांनी केले , अतिथींचे परिचय प्रा. अनिल काळोखे यांनी तर परीक्षकांचा परिचय आणि आभार प्रा. अक्षय भोसले यांनी मानले. स्पर्धेचे नियोजन करण्यात प्रा. अक्षय भोसले, प्रा. वैशाली पेंढारकर, प्रा. कांचन खीरे,प्रा. अक्षय शिंदे व सर्व संगणक शास्त्र आणि बी. सी. ए. (सायन्स ) विभागाचे सहकारी यांनी मोलाचे योगदान दिले.