शैक्षणिक

विद्या प्रतिष्ठान मध्ये एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

६७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

विद्या प्रतिष्ठान मध्ये एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

६७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

बारामती वार्तापत्र

विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामधील बीबीएसीए विभाग अंतर्गत
वर्डप्रेस,एच,टी.एम.एल.,सी एस.एस.,जावास्क्रिप्ट,पी.इच.पी.यावर आधारीत वेब डेवलपमेंट या विषयवार कार्यशाळा संपन्न झाली.

या कार्यशाळेत महाविद्यालायातील एसवाय बीबीएसीए या वर्गातील ६७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

विभागप्रमुख महेश पवार यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये वेब डेवलपमेंट तंत्रज्ञानाच्या सतत विकसित होत असलेल्या क्षेत्रात, वेब विकास हा डिजिटल युगाचा आधारस्तंभ आहे.ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मपासून परस्परसंवादी सोशल नेटवर्क्सपर्यंत, आपण दररोज वापरत असलेल्या वेबसाइट्स आणि ॲप्लिकेशन्स ही कुशल वेब डेव्हलपरची निर्मिती आहे.
2025 मध्ये या टेक्नोलॉजिज मुळे कृत्रिम तंत्रज्ञान क्षेत्रातील संभाव्य उपलब्ध संधी प्राप्त होण्यास मदत होईल असे प्रतिपादन केले.

प्रमुख पाहुण्यांचा परिचय कार्यशाळा समन्वयक विशाल शिंदे यांनी करून दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भरत शिंदे सर यांनी वेब टेक्नोलॉजिजचा वापर केल्यास उत्तम संधी प्राप्त व्हाव्या हा या कार्यशाळेमागचा मुख्य उद्देश आहे अशी आशा व्यक्त केली.
महाविद्यालयाचे उप-प्राचार्य डॉ.शामराव घाडगे सर यांनी नवीन तंत्रज्ञानाचा उदय होत असताना, या क्षेत्रात प्रगती करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी नवीनतम वेब डेव्हलपमेंट कौशल्ये जाणून घेणे महत्त्वाचे आहे असे नमूद केले.

कार्यशाळेचे तज्ञ वक्ते मा.रमेश हांडे सर यांनी वर्डप्रेस,एच,टी.एम.एल.,सी एस.एस.,जावास्क्रिप्ट टेक्नोलॉजिचा वापर करून प्रत्यक्ष वेब साईट प्रात्यक्षिकासहित तयार करुन दाखवली.

कार्यशाळेला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भरत शिंदे,उप-प्राचार्य डॉ.शामराव घाडगे ,डॉ.लालासाहेब काशीद यांचे सहकार्य लाभले.सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विशाल शिंदे सर यांनी मांडले.

तसेच अनिल काळोखे, पुनम गुंजवटे, अक्षय शिंदे,अक्षय भोसले,वैशाली पेंढारकर, शुभांगी निकम, सतीश चौधर यांनी कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी मदत केली.

Related Articles

Back to top button