शैक्षणिक

विद्या प्रतिष्ठान मध्ये फ्युचर टेक आयटी सॉफ्टवेअर कंपनीचा प्लेसमेंट ड्राईव्ह आणि कॅम्पस सिलेक्शन संपन्न

६४ विद्यार्थी उपस्थित होते.

विद्या प्रतिष्ठान मध्ये फ्युचर टेक आयटी सॉफ्टवेअर कंपनीचा प्लेसमेंट ड्राईव्ह आणि कॅम्पस सिलेक्शन संपन्न

६४ विद्यार्थी उपस्थित होते.

बारामती वार्तापत्र 

विद्या प्रतिष्ठानचे कला विज्ञान, व वाणिज्य महाविद्यालय मधील बीबीए सीए विभागामार्फत फ्युचर आयटी टेक सॉफ्टवेअर कंपनीचा प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात आला होता ह्या प्लेसमेंट ड्राईव्हसाठी महाविद्यालयातील बी बी ए सी ए ,बीसीएस , बीसीए , एमसीएस, एमसीए या विभागातील ६४ विद्यार्थी उपस्थित होते.

विभाग प्रमुख महेश पवार यांनी आपल्या प्रास्ताविकेत ही फक्त मुलाखत नाही ही एक संधी आहे विद्यार्थ्यांनी स्वतःला सिद्ध करण्याची आत्मविश्वासाने पुढे जाण्याची आणि आपल्या मेहनतीला यशात परिवर्तित करण्याची असा संदेश विद्यार्थ्यांना देऊन शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भरत शिंदे सर यांनी हा प्लेसमेंट ड्राईव्ह केवळ एक औपचारिक संधी नाही तर तो विद्यार्थ्यांच्या मेहनीतीचा, चिकाटीचा आणि स्वप्नांच्या मूर्त रूप आहे.

शिक्षणाच्या चार वर्षाच्या प्रवासानंतर विद्यार्थ्यांनी स्वतः मध्ये जो ज्ञानसंपदा,कौशल्य , अनुभव आणि आत्मविश्वास बाळगला आहे त्याची आज कसोटी आहे असे प्लेसमेंट ड्राईव्ह चे महत्व समजवले आज आपल्या संस्थेत पाऊल ठेवलेल्या प्रतिष्ठित कंपन्याचे स्वागत करतो या कंपनीत विद्यार्थ्यांन मध्ये असलेल्या प्रचंड क्षमतेवर विश्वास दाखवून त्यांना संधी देण्याची तयारी दाखवली आहे यासाठी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले तसेच एक गोष्ट विसरू नका या कंपनीतून फक्त नोकरी मिळत नाहीत तर एक करियर, एक ओळख मिळते असे विद्यार्थ्यांना संदेश दिला.

या प्लेसमेंट ड्राईव्ह साठी फ्युचर आयटी टेक सॉफ्टवेअर कंपनी मधील रोहित खताळ, गौरी बोरकर ,सानिका कदम ,अक्षय जगताप ,सोनिया कदम उपस्थित होते. रोहित खताळ यांनी आपल्या प्री प्लेसमेंट टॉक मध्ये विद्यार्थ्यांना कंपनी बद्दल सांगितले तसेच विद्यार्थ्यांना निवड झाल्यानंतर त्यांना मिळणाऱ्या पदाबद्दल माहिती दिली.
ह्या प्लेसमेंट ड्राईव्ह मधून एमसीएस विभागातील ऐश्वर्या बहिर्मल हिची यु आय/ यु एक्स डेव्हलपर म्हणून निवड करण्यात आली तिला 2.7 चे वार्षिक पॅकेज मिळाले तसेच बीबीए सीए विभागातील काळे समीक्षा , बीसी ए विभागातील अमर खरात यांचे वेब डेव्हलपमेंट इंटरशिप साठी निवड करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली पेंढारकर यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय प्लेसमेंट कॉर्डिनेटर शुभांगी निकम यांनी करून दिला आभार प्रदर्शन पूनम गुंजवटे यांनी मानले.
हा प्लेसमेंट ड्राईव्ह यशस्वी करण्यासाठी विशाल शिंदे ,अनिल काळोखे ,अक्षय भोसले ,अक्षय शिंदे, अमृता भोसले , श्रद्धा ननवरे यांनी मोलाचे सहकार्य केले.

Related Articles

Back to top button