
विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक विद्यार्थ्यांची वनवारी
वन उद्यान १५५ एकरात
बारामती वार्तापत्र
विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळेतील इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी शनिवार दिनांक २/०८/२०२५ रोजी कन्हेरी या ठिकाणी असलेल्या वन-उद्यानाला`सायकलवर’ भेट दिली. या सहलीचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाचे महत्त्व, वन्यजीवांचे संरक्षण व निसर्ग प्रेम याबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता.
या ठिकाणी विद्यार्थ्यांनी श्रमदान केले. “हरित सेना, एन.सी.सी. विभागाअंतर्गत विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. तसेच जिल्हा परिषदेच्या ‘एक पेड माॅं के नाम’ या उपक्रमा अंतर्गत प्रत्येक वर्गातील तीन माता पालकांनी प्रत्येकी एक एक झाड लावले.
या शैक्षणिक भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना उद्यानातील विविध वनस्पती, औषधी झाडे व जैवविविधतेची माहिती श्री. गोलांडे साहेब यांनी सांगितली. तसेच हे वन उद्यान १५५ एकरात तयार केलेली असून, या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे खेळ तयार करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्याचबरोबर डॉक्टर भोईटे सर यांनी ‘जिवंत माती व मृत माती’ कशी ओळखायची हे विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच ‘ग्लोबल वॉर्मिंग’ कशाला म्हणतात! हेही त्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना समजेल व लक्षात राहील अशा साध्या व सोप्या भाषेत सांगितले. या शैक्षणिक सहली दरम्यान विद्यार्थ्यांनी निसर्गा विषयी, औषधी वनस्पती विषयी अनेक प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन श्री.गोलांडे साहेब व श्री. भोईटे साहेब यांनी केले. उद्यानातील सर्व परिसर बघून झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी वनभोजनाचा आस्वाद घेतला व ते परतीच्या मार्गाला लागले
.
या क्षेत्रभेटीमध्ये शाळेतील अकराशे तीस विद्यार्थी तसेच 35 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.
आपण ही क्षेत्रभेट सौ. अश्विनी शिंदे मॅडम, आगलावे साहेब, पोंदकुले साहेब, वाघमोडे साहेब तसेच त्यांचे इतर सहकारी वृंद या सर्वांच्या सहकार्यामुळे घेऊ शकलो. शाळेचे माननीय मुख्याध्यापक श्री. यादव सर, उपमुख्याध्यापक श्री. कोरे सर, पर्यवेक्षक श्री. रकटे सर तसेच सहल विभाग प्रमुख श्री. दोशी सर व सौ. पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनामुळे व शाळेतील इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे ही क्षेत्रभेट उत्कृष्टरित्या व आनंददायी वातावरणात पार पडली.
सर्वात शेवटी व अत्यंत महत्त्वाचे म्हणजे हे वन उद्यान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार साहेब यांच्या प्रेरणेतून व कल्पनेतून साकार होत आहे.