जगात पहिल्यांदा भारतात डुकराचे हृदय माणसाच्या शरिरात धडकले,कशी झाली प्रत्यारोपण शस्त्रक्रिया?
हे ट्रान्सप्लान्ट करणाऱ्या मेडिकल टीमनं अनेक वर्षांच्या संशोधनाच्या आधारे हा प्रयोग पूर्ण केला आहे.

जगात पहिल्यांदा भारतात डुकराचे हृदय माणसाच्या शरिरात धडकले,कशी झाली प्रत्यारोपण शस्त्रक्रिया?
हे ट्रान्सप्लान्ट करणाऱ्या मेडिकल टीमनं अनेक वर्षांच्या संशोधनाच्या आधारे हा प्रयोग पूर्ण केला आहे.
प्रतिनिधी
जगात पहिल्यांदा भारतात डुकराचे हृदय माणसाच्या शरिरात धडकल्याची खबरबात सगळीकडे धडकली. 1997 मध्ये औषधी विज्ञान शास्त्रातील या अचंबित करणा-या प्रयोगाने देशाला हुरळून नव्हे तर हादरुन टाकले. देशातील राजकारणी तर इतके हादरले की त्यांनी हा प्रयोग राबविणारे डॉ. धनी राम बरुहा यांना थेट तुरुंगात टाकले आणि मानवी आरोग्यातील ढवळाढवळ थांबवल्याची कोण शाबासकी त्यांनी मिळवली. पण आपला हा करंटेपणा, अमेरिकेत हाच प्रयोग राबविण्यात आल्यानंतर आणि या प्रयोगाला जगाने डोक्यावर घेतल्यानंतर आपले कपाळमोक्ष करणारा ठरला.
जिवंत डुकराचे ह्दय मानवात प्रत्यारोपण झाल्याची बातमी अमेरिकेतून धडकली नी सर्वांच्या नजरा आसाममधील गुवाहाटीपासून अगदी 20 किलोमीटरच्या हाकेवर असणा-या हर्ट सिटीकडे वळल्या. 72 वर्षांचे डॉक्टर धनी राम बरुआ यांनी 25 वर्षांपूर्वी 1997 साली हा प्रयोग केला होता. आजारपणामुळे त्यांना त्यांच्या भावना फारशा व्यक्त करता आल्या नाहीत. पण त्यांच्या या प्रयोगाचे फलित अमेरिकेत दिल्याचे समाधान आणि भारतात त्यांना समजून न घेतल्याचा खेद त्यांच्या चेह-यावर दिसत होता. त्यांच्या दीर्घकाळापासून सहकारी असणा-या डॉ. गीता यांनी त्यांच्या भावना माध्यमापर्यंत पोहचवल्या. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, डॉक्टर जे काही बोलतायेत, ते फारसं समजू शकत नाही. परंतू, या वैद्यकीय प्रयोगाची आणि त्याच्या यशाची त्यांना पूर्ण जाण आहे. त्यांनी 1997 साली केलेल्या शस्त्रक्रियेची ही त्यांना आठवण आहे.
डुकराच्या आतड्याच्या मदतीने तयार केली कृत्रिम योनी
झेक प्रजासत्ताकची ही केस आहे. प्रायव्हेट पार्टमध्ये गंभीर समस्या असलेल्या महिलेवर डॉक्टरांनी अनोख्या पद्धतीने उपचार केले. या महिलेची योनी एवढी अरुंद होती की, सेक्स करणे तर दूरच, डॉक्टरही तपासणी करू शकत नव्हते. अशा परिस्थितीत डुकराच्या आतड्याच्या मदतीने शस्त्रक्रियेद्वारे या महिलेचा प्रायव्हेट पार्ट नव्याने तयार करण्यात आला.
डेली मेल या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, झेक रिपब्लिकमधील ही महिला तिच्या स्त्रीरोगतज्ज्ञांकडे तपासणीसाठी गेली होती. महिलेचा प्रायव्हेट पार्ट इतका लहान होता की त्याची तपासणीही करता येत नाही, असे डॉक्टरांना आढळले. अशा परिस्थितीत त्यांनी तिला पश्चिम झेक प्रजासत्ताकमधील प्लझेन शहरातील विद्यापीठ रुग्णालयात उपचारासाठी पाठवले.
येथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांना आढळले की महिलेला स्क्लेरोडर्मा आहे, ज्यामध्ये त्वचा कडक होते आणि आकुंचन पावते. अशा स्थितीत डॉक्टरांनी ‘मेश ऑगमेंटेड व्हजायनल रिकन्स्ट्रक्शन टेक्निक’ वापरण्याचा निर्णय घेतला. या प्रक्रियेत, प्रभावित भागात फ्रेश टिशू लागू केले जाते. यामध्ये मानवी त्वचा किंवा डुकराच्या आतड्याचा वापर केला जातो. कारण डुकराचे टिशू मऊ असतात आणि त्यांची रचना देखील मानवी टिशूंसारखी असते.
चीनमध्ये बर्न केस सर्जरीमध्ये डुकराचे चामडे वापरले जाते
चीनमधील शास्त्रज्ञांनी डुक्कर आणि मानव यांच्या जनुकांचे मिश्रण करून त्वचेचा एक नवीन प्रकार (Human and pig gene hybrid) विकसित केला आहे, जो मानवांवर लागू केला जाऊ शकतो. शास्त्रज्ञांचा हा शोध भाजलेल्या आणि अॅसिड हल्ल्यातील पीडितांवर उपचारासाठी महत्वाचा टप्पा मानला जात आहे. म्यूटेंट ‘त्वचा’ हे त्या दिशेने आणखी एक पाऊल आहे, ज्यामध्ये डुकरांमध्ये मानवांमध्ये प्रत्यारोपित करता येणारे अवयव तयार केले जात आहेत.