स्थानिक

विद्या प्रतिष्ठान संस्थेचे माजी खजिनदार रमणिक मोता यांचे निधन..!

अंत्ययात्रा उद्या सकाळी आठ वाजता अशोकनगर येथील राहत्या घरापासून निघेल.

विद्या प्रतिष्ठान संस्थेचे माजी खजिनदार रमणिक मोता यांचे निधन..!

अंत्ययात्रा उद्या सकाळी आठ वाजता अशोकनगर येथील राहत्या घरापासून निघेल.

बारामती वार्तापत्र

बारामतीतील मोता या कापड व्यवसायातील अग्रेसर परिवाराचे प्रमुख रमणिक रामजी मोता यांचे आज दुपारी 3 वाजता निधन झाले.

बारामती शहराच्या वाणिज्यविषयक आर्थिक जडणघडणीत त्यांनी मोलाचे योगदान दिले. बारामतीतील कापड व्यवसायातील प्रमुख व्यापाऱ्यांपैकी एक व्यापारी होते. ते विद्या प्रतिष्ठान संस्थेचे माजी खजिनदार होते.बारामती नगरपालिकेचे माजी नगरसेवक म्हणूनही त्यांची कारकिर्द महत्वाची होती. बारामती सहकारी बँकेचे संचालक, बारामती स्व. माणिकबाई चंदुलाल सराफ ब्लड बँक, पश्चिम महाराष्ट्र कच्छी समाजाचे अध्यक्ष व बारामती जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघाचे माजी अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. बारामती येथील रेल्वे सल्लागार समितीवरही त्यांनी काम पाहिले आहे. बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कचे संचालक म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम केले. बारामती क्लबचे ते संस्थापक संचालक होते, येथील जायंटस ग्रुप ऑफ बारामतीवर देखील त्यांनी अनेक वर्ष काम केले.

Related Articles

Back to top button