विद्या प्रतिष्ठान सेंटर ऑफ एक्सलन्सचे डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग अँड रोबोटिक ऑटोमेशन सेंटरला यशदा प्रशिक्षणार्थीची भेट
४३ प्रशिक्षणार्थींनी या सेंटरला भेट
विद्या प्रतिष्ठान सेंटर ऑफ एक्सलन्सचे डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग अँड रोबोटिक ऑटोमेशन सेंटरला यशदा प्रशिक्षणार्थीची भेट
४३ प्रशिक्षणार्थींनी या सेंटरला भेट
बारामती वार्तापत्र
यशदा ही संस्था नेहमीच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या अधिकारी वर्गाला प्रशिक्षण देण्याचे कार्य करीत असते.
या संस्थेमार्फत उच्च व तंत्र शिक्षण विभागातील संवर्ग अ मधील प्रशिक्षण घेणाऱ्या सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक अशा जवळपास ४३ प्रशिक्षणार्थींनी या सेंटरला भेट दिली.
या सेंटरच्या प्रभारी प्रा. प्राची काळे, डॉ. पी. आर. चित्रगार, यांनी या आलेल्या सर्व प्रशिक्षणार्थी अधिकारी वर्गाला सखोल मार्गदर्शन केले. तसेच सिम्युसॉफ्ट कंपनीचे संचालक सुनील चोरे यांनी या भेटीबद्दल महत्त्वाची भूमिका बजावली.
सिम्युसॉफ्ट कंपनीचे तंत्रज्ञ स्वप्निल कारभारी व इतरांनी वेगवेगळ्या ऑटोमॅटिक मशीनची इत्यंभूत माहिती त्यांना दिली. प्रशिक्षणाचे प्रशिक्षण समन्वयक प्रमुख श्री. विजय चव्हाण साहेब यांचा महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुधीर लांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.