विद्येचे माहेर असलेल्या पुणे शहरात दिगंबर जैन हुमड समाज संस्कृती, शिक्षण व संस्कार संवर्धनाचे सुसज्ज केंद्र व्हावे : मुनी अमोघकीर्ती महाराज
मुलांना शिष्यवृत्ती व गंभीर आजाराच्या रुग्णांना ऑपरेशन साठी मदत
विद्येचे माहेर असलेल्या पुणे शहरात दिगंबर जैन हुमड समाज संस्कृती, शिक्षण व संस्कार संवर्धनाचे सुसज्ज केंद्र व्हावे : मुनी अमोघकीर्ती महाराज
मुलांना शिष्यवृत्ती व गंभीर आजाराच्या रुग्णांना ऑपरेशन साठी मदत
इंदापूर प्रतिनिधी –
पुणे हे विद्येचे माहेरघर असून शहरात भारत वर्षीय दिगंबर जैन हुमड समाज संस्कृती, शिक्षण व संस्कार संवर्धनाचे महत्वपूर्ण केंद्र होणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन श्री १०८ मुनी अमोघकीर्ती महाराज यांनी केले.
फेडरेशन ऑफ हुमड जैन समाज आंतरराष्ट्रीय संघटनेच्या वतीने पुणे माणिकबाग येथील श्री १००८ भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर सभागृहात आयोजित पुणे जिल्हास्तरीय मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी फेडरेशनचे नूतन शिरोमणी संरक्षक, फेडरेशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. रविकिरण शहा यांचा फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष विपीन गांधी, राष्ट्रीय महामंत्री महेंद्र बंडी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अमोघकिर्ती महाराज पुढे म्हणाले, हुमड समाजाची निर्मिती आचार्य माघनंदी महाराज यांचे शिष्य हेमचंद्र मुनी महाराज यांच्यामुळे झाली. हुमड चा अर्थ हुशार, मनन शील आणि धाडशी गुण असलेला समाज असा असून वालचंद, हिराचंद सारखा कृषीऔद्योगिक क्रांती करणारा दृष्ट्रा उद्योगपती या समाजाने देशाला दिला आहे. समाजाची लोकसंख्या फक्त १ लाख २० हजार असून समाजात दसा व बिसा हुमड असे पंथ भेद असले तरी त्यांचे १८ गोत्र एकच आहेत. त्यामुळे हे भेद मिटून समाज एकसंघ होणे गरजेचे आहे. त्या पार्श्वभूमीवर फेडरेशनचे कार्य आदर्श व स्तुत्य असून फेडरेशनने गुजरात मधील आपले मूळस्थान असलेल्या
इडर जवळील खेडब्रह्मा येथे देखील मोठे सांस्कृतिक केंद्र उभे करावे म्हणजे आपल्या कुलदैवत, देवीचे दर्शन, कुलाचार करण्यासाठी वर्षातून एकदा सर्व समाज तेथे एकत्र येईल अशी सूचना त्यांनी केली.
यावेळी हुमड जैन फेडरेशन आंतरराष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष विपीन गांधी म्हणाले, फेडरेशन ची स्थापना सन २००७ मध्ये झाली असून सध्या ४ हजार महिला व १० हजार पुरुष सुई दोऱ्या प्रमाणे समाज एकत्र करण्याचे काम करत आहेत. पुणे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे हुमड केंद्र स्थापन करण्यात येणार असून यामध्ये दिगंबर जैन शिक्षण, संस्कृती व संस्कार केंद्र, मुला मुलींसाठी सुसज्ज वसतिगृह, वृद्धाश्रम, आरोग्य मंदिर, त्यागी निवास व आहार व्यवस्था आदींची सोय करण्यात येणार आहे. मुलांना शिष्यवृत्ती व गंभीर आजाराच्या रुग्णांना ऑपरेशन साठी मदत करण्यात येत आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी त्यासाठी आपले भरीव योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी श्री १०८ दिगंबर मुनी अमरकिर्ती महाराज, फेडरेशनचे राष्ट्रीय महामंत्री महेंद्र बंडी, चकोर गांधी, सुशील शहा, राष्ट्रीय महिला अध्यक्षा सुजाता शहा यांची भाषणे झाली. यावेळी किरणकुमार शहा, विपीन गांधी, महेंद्र बंडी, शकुंतला बंडी, चकोर गांधी, किशोर शहा, राजमल कोठारी, मिहिर गांधी, डॉ. श्रेणिक शहा, सुरेंद्र गांधी, सूर्यकांत शहा, सुजाता शहा, संज्योत व्होरा, चेतन शहा वाल्हेकर, अतुल गांधी, अमृत गांधी, वीरकुमार शहा, डॉ. संदेश शहा, अक्षय दोशी आदींचा समाजसेवी कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक, सूत्रसंचलन फेडरेशनचे माजी अध्यक्ष डॉ. श्रेणिक शहा यांनी तर आभार प्रदर्शन वीरेंद्र शहा यांनी केले.