विनापरवानगी बैलगाडा शर्यत आली अंगलट : वाघळवाडी येथील २५ युवकांवर वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचा अवमान

विनापरवानगी बैलगाडा शर्यत आली अंगलट : वाघळवाडी येथील २५ युवकांवर वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचा अवमा
बारामती वार्तापत्र
विनापरवानगी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करणाऱ्या आयोजकांना बैलगाडा शर्यत चांगलीच महागात पडली आहे. बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करणाऱ्या 25 जणांवर वडगाव निंबाळकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
1)अजय तात्याबा सावंत 2)जालीदंर शकर अनपट 3) शुभम उर्फ बाबु जाधव पुर्ण नाव माहीत नाही 4)रुत्विक उर्फ बापु सावंत पुर्ण नाव माहीत नाही 5) महादेव सकुंडे पुर्ण नाव माहीत नाही 6)विकी सावंत पुर्ण नाव माहीत नाही 7)सुहास गोरख जाधव 8)प्रणव उर्फ मोन्या बापुराव सावंत 9) सवाणे पुर्ण नाव माहीत नाही. सर्व रा. वाघऴवाडी ता.बारामती जि. पुणे 10)जगताप पुर्ण नाव माहीत नाही रा मऴशी वाणेवाडी ता बारामतीसह अन्य दहा ते पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचा अवमान करून 12 जानेवारी रोजी बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे विनापरवानगी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते शर्यतीदरम्यान वाढत्या कोरोना व ओमिक्रोन विषाणूच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारची काळजी घेण्यात आली नव्हती शर्यतीदरम्यान अनेकांनी सामाजिक अंतर व मास्क लावलेले नव्हते त्यामुळे कोरोना व ओ मिक्रोन विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्यास व नागरिकांच्या आरोग्यास धोका पोहोचेल असे हाय बाईची कृती केल्याने आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर सानप यांनी फिर्याद दिली पुढील तपास पोलीस हवालदार नागटिळक करत आहेत