विभागीय बाॅक्सिग स्पर्धेत ज्ञानसागर चे वर्चस्व ! राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड !
चिकाटी, शिस्त, आणि सातत्याने घेतलेली मेहनत

विभागीय बाॅक्सिग स्पर्धेत ज्ञानसागर चे वर्चस्व ! राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड !
चिकाटी, शिस्त, आणि सातत्याने घेतलेली मेहनत
बारामती वार्तापत्र
शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे आयोजित विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियम, भवानी पेठ, पुणे येथे नुकतीच पार पडली.
या स्पर्धेत बारामती तालुक्यातील ज्ञानसागर गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, सावळ येथील विद्यार्थी कु.शिवराजे कौले याने नुकत्याच पार पडलेल्या विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून गोल्ड मेडल मिळवून त्यांची तीन जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
संपूर्ण परिसरात त्याचे अभिनंदन होत आहे. सलग चौथ्यांदा शिवराजने विभागीय बाॅक्सिग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून आपल्या आक्रमक आणि तांत्रिक खेळाने प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवत विजेतेपद मिळवले. त्याची ही यशोगाथा केवळ वैयक्तिक कामगिरी न राहता, गुरुकुलाच्या शिस्तबद्ध प्रशिक्षण पद्धतीचे आणि क्रिडा प्रशिक्षक अमर भंडलकर सर आणि आशिष डोईफोडे सर यांच्या मार्गदर्शनाचे फलित असल्याचे मानले जात आहे.
संस्थापक अध्यक्ष डॉ. सागर आटोळे सर यांनी शिवराजेचे अभिनंदन करताना म्हटले की, “कु. शिवराजे कौले याने विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून संपूर्ण ज्ञानसागर गुरुकुल, सावळचे नाव उज्ज्वल केले आहे.
त्याच्या या यशामागे चिकाटी, शिस्त, आणि सातत्याने घेतलेली मेहनत आहे. अशा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असलेली गुणवत्ता ओळखून त्यांना योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि संधी दिल्यास ते निश्चितच राज्य व राष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडू शकतात, हे शिवराजने दाखवून दिले आहे.
या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकण्याची प्रेरणा मिळत आहे.
ज्ञानसागर गुरुकुल, सावळचे संस्थापक, मुख्याध्यापक आणि प्रशिक्षक यांनी शिवराजेचे विशेष अभिनंदन करत त्याला पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.