स्थानिक
विवाह समारंभात अक्षदा पडण्याच्या अगोदर नवरा नवरी ने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस केक कापून केला साजरा..
या अनोख्या विवाह समारंभाची आज बारामतीत सर्वत्र चर्चा..

विवाह समारंभात अक्षदा पडण्याच्या अगोदर नवरा नवरी ने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस केक कापून केला साजरा..
या अनोख्या विवाह समारंभाची आज बारामतीत सर्वत्र चर्चा..
डोर्लेवाडी :बारामती वार्तापत्र
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज 62 वा वाढदिवस आहे.. अजित पवार यांचे अनेक चाहते त्यांच्या प्रेमापोटी वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करत असतात असाच अनोखा वाढदिवस बारामतीमध्ये पाहिला मिळाला आणि तोही चक्क विवाह समारंभात.. बारामतीतील अजित दादाचे कट्टर समर्थक बारामती बाजार समितीचे सभापती वसंत गावडे यांच्या कन्येचा विवाह समारंभ आज 22 जुलै रोजी बारामतीतील रयत भवन या कार्यालयात पार पडला.. यावेळी गावडे यांनी पवार कुटूंबियांवर असलेल्या प्रेमापोटी आपल्या मुलीच्या विवाह सोहळ्या अगोदर नवरा नवरीच्या हस्ते केक कापून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस साजरा केलाय.. यामुळे या अनोख्या विवाह समारंभाची आज बारामतीत सर्वत्र चर्चा सुरू आहे..