विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शाहू हायस्कूल मध्ये उत्साहात साजरी
भारतीय न्याय शास्त्रज्ञ ,अर्थशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, आणि समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शाहू हायस्कूल मध्ये उत्साहात साजरी
भारतीय न्याय शास्त्रज्ञ ,अर्थशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, आणि समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते.
बारामती वार्तापत्र
श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज बारामती येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली शाहू हायस्कूलचे प्राचार्य माननीय श्री बी.एन पवार साहेब यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी पर्यवेक्षक श्री ए.एस साळुंके शिक्षक प्रतिनिधी श्री जी आर तावरे आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर वृंद उपस्थित होते
सहकारी शिक्षक श्री व्ही.बी.सरतापे सर यांनी आंबेडकरांविषयी माहिती देत असताना ते म्हणाले भारतीय न्याय शास्त्रज्ञ ,अर्थशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, आणि समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते.
त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली
अध्यक्षीय भाषणात माननीय प्राचार्य बी.एन पवार साहेब म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांच्या आणि कामगारांचा हक्काचे समर्थन केले ते ब्रिटिश भारताचे मजूर मंत्री स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार होते कार्यक्रमाचे आयोजन सौ सोडनवर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार मा. श्री जी आर तावरे सर यांनी मानले.