महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची इंदापूर भाजपाची मागणी
निवासी नायब तहसीलदार यांना दिले पत्र

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची इंदापूर भाजपाची मागणी
निवासी नायब तहसीलदार यांना दिले पत्र
इंदापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे या पोलिस अधिकाऱ्यास दिलेले आदेश बेकायदेशीर असून ही घटना पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे म्हणत इंदापूर भारतीय जनता पक्षाकडून इंदापूर तहसील कार्यालयाच्या समोर विविध घोषणाबाजी करत राजीनाम्याची मागणी केली.
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून राज्यात भ्रष्टाचार, हिंसाचार,आत्याचार या मार्गाने जनतेची सतत लूट करत आहेत. जनतेने निवडून दिलेले रक्षण करते माय-बाप सरकार व मंत्रीच जर भ्रष्टाचार व अत्याचार करावयास लागले तर सर्वसामान्य जनतेने दाद मागायची कुणाकडे ? गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एवढी मोठी रक्कम चुकीच्या मार्गाने गोळा करणे म्हणजेच खंडणी वसूल करण्यासारखेच आहे याचा जाब सरकारने द्यावा अशी मागणी दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तसेच राज्य सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे, संजय राठोड, अथवा गृहमंत्री अनिल देशमुख या सर्वांनी पुरोगामी महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. असे सरकार भविष्यात जनतेचे प्रश्न काय सोडवणार ! अनिल देशमुख हे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत.गृहखाते त्यांच्याकडे आहे,जनतेचे रक्षण करणे शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांची असताना हा प्रकार लांच्छनास्पद आहे. या बाबींचा विचार करता अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अन्यथा इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा भारतीय जनता पक्षाकडून देण्यात आला आहे.
यावेळी महाविकास आघाडी सरकारच करायचं काय खाली डोक वर पाय,महाविकास आघाडी सरकारचा निषेध असो अशा विविध घोषणा यावेळी देण्यात आल्या.यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष शरद जामदार,शहराध्यक्ष शकील सय्यद,गजानन वाकसे, तानाजी थोरात,राम आसबे, ललेंद्र शिंदे,इम्रान जमादार,अंकुश गोसावी,युवराज म्हस्के,हर्षवर्धन कांबळे,प्रेमकुमार जगताप,नाना गोसावी,सतीश भोसले,शिवाजी तरंगे,शितल साबळे,लालासो सपकळ,अविनाश कोथमिरे,विलास माने,शहाजी शिंदे,बाळासो पानसरे, प्रमोद चितारे,सागर गानबोटे यांच्या सह्यांचे निवेदन निवासी नायब तहसीलदार यांना देण्यात आले.