इंदापूर

वीजेचा धक्का बसून बैलजोडीचा दुर्दैवी अंत

कालठन नं.१ येथे घडली घटना

वीजेचा धक्का बसून बैलजोडीचा दुर्दैवी अंत

कालठन नं.१ येथे घडली घटना

इंदापूर : प्रतिनिधी

इंदापूर तालुक्यातील कालठण नं.१ येथे श्रीराम विठ्ठल लकडे या शेतकऱ्याच्या ऊसाची तोड चालू असताना आज दि.२२ रोजी पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास विद्युत वाहिनीवर पाय पडल्याने विजेचा धक्का लागून बैल जोडीचा दुर्दैवाने अंत झाला.

बारामती ॲग्रो साखर कारखान्याची टोळी ऊसतोडीसाठी येत होती.त्यावेळी महावितरण विभागाच्या तुटून रस्त्यावर पडलेल्या उच्चदाब वाहिनीच्या तारेवर बैलांचा पाय पडला.वीजेचा धक्का बसून बैलगाडीला जुंपलेले दोन बैल जागेवरच मृत्युमुखी पडले.

Back to top button