वीरश्री मालोजीराजे गढीवरील अतिक्रमणाविरोधात रस्ता रोको

तब्बल 4 तास रास्ता रोको आंदोलन

वीरश्री मालोजीराजे गढीवरील अतिक्रमणाविरोधात रस्ता रोको

तब्बल 4 तास रास्ता रोको आंदोलन

इंदापूर प्रतिनिधी –

सकल हिंदू समाज इंदापूर तालुका यांच्या वतीने श्रीमंत मालोजीराजे भोसले यांच्या समाधी व गढीवरील अनधिकृत अतिक्रमणाविरोधात पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गलांडवाडी पाटी येथे गुरुवारी (दि. 24) रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

वीरश्री सरदार मालोजीराजे भोसले यांच्या समाधीस्थळावर जिहादी अतिक्रमणाच्या विरोधात हजारो हिंदू बांधवांनी रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर तब्बलचार तास रास्ता रोको आंदोलन केलं. हिंदू स्वाभिमानासाठी आणि इतिहासाच्या रक्षणासाठी उभं राहणं ही आजची गरज आहे, हे या आंदोलनातून पुन्हा सिद्ध झालं आहे. प्रशासनाने अतिक्रमण तत्काळ हटवावं, अशीठाम मागणी करण्यात आली. मालोजीराजेंच्या पवित्र स्मारकावर कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण खपवून घेतलं जाणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमदार गोपीचंद पडळकर यांनीराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून थेट चर्चा झाली. या चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी अतिक्रमण तत्काळ हटवले जाईल आणि मालोजीराजेंच्या स्मरणार्थ भव्य आणि भक्कम स्मारक उभारले जाईल, असे आश्वासन दिले.

Related Articles

Back to top button