क्रीडा

वीर सावरकर जलतरण तलाव बारामती च्या स्विमर्स ची पुणे जिल्हा क्रीडा स्पर्धा मध्ये दमदार कामगिरी

अंडर १४ गटामध्ये.

वीर सावरकर जलतरण तलाव बारामती च्या स्विमर्स ची पुणे जिल्हा क्रीडा स्पर्धा मध्ये दमदार कामगिरी

अंडर १४ गटामध्ये.

बारामती वार्तापत्र 

पुणे जिल्हा ग्रामीण शालेय जलतरण क्रीडा स्पर्धा ९ सप्टेंबर २०२५ रोजी लांडेवाडी आंबेगाव येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये वीर सावरकर स्वीमर्स क्लब च्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी केली व कामगीरी च्या आधारावर पुढील विभागीय स्पर्धा साठी त्यांची निवड झाली.

अंडर १४ गटामध्ये. साद इरफान तांबोळी: ४०० मी फ्री स्टाईल प्रथम, २०० मीटर फ्री स्टाईल मध्ये द्वितीय, ५० मीटर बटरफ्लाय मध्ये प्रथम क्रमांक मिळवला कुमारी श्रीनिधी संतोष कुलकर्णी हिने २०० मीटर ब्रेथ स्ट्रोक मध्ये प्रथम , ४०० मीटर फ्री स्टाईल मध्ये द्वितीय , २०० मीटर फ्री स्टाईल मध्ये द्वितीय क्रमांक मिळवला व जुनेद जमीर शेख याने १०० मीटर ब्रेथ स्ट्रोक मध्ये ३ क्रमांक मिळवला.

अंशूमन नागमल याने ५० मीटर फ्री स्टाईल मध्ये प्रथम २०० मीटर फ्री स्टाईल मध्ये द्वितीय क्रमांक मिळवला .
साद तांबोळी व श्रनिधी कुलकर्णी हे विद्या प्रतिष्ठान इंग्रजी माध्यम या शाळेत शिकत आहेत तर जुनेद शेख हा आर.एन.अगरवाल शाळेत शिकत आहे.

विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल जलतरण तलावाचे अध्यक्ष डॉ. अशोक तांबे , सल्लागार जवाहर वाघोलीकर, सदाशिव सातव, सचिव विश्वास शेळके व खजिनदार मिलिंद अत्रे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या
या विद्यार्थाचे प्रशिक्षक आयर्मन ओम सावळे पाटील व इरफान तांबोळी यांनी प्रशिक्षण दिले.

Back to top button