
वृषारोपण काळाची गरज: किशोर माने
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान
बारामती वार्तापत्र
सिमेंटची जंगले वाढत असताना येणाऱ्या पिढीला आवश्यक ऑक्सिजन पुरवठा होणे साठी व मानवी जीवन सुकर होणे साठी वृषारोपन करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन बारामती पंचायत समिती हे गटविकास अधिकारी किशोर माने यांनी केले.
अंजनगाव ग्रामपंचायत च्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत स्वच्छता आणि वृक्षारोपण चा शुभारंभ किशोर माने यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
या प्रसंगी सरपंच वंदना परकाळे, सोमेश्वर चे व्हाईस चेअरमन बाळासाहेब परकाळे,स्वराज्य फर्निचर चे संचालक सुरेश परकाळे मार्केट कमिटी संचालिका प्रतिभा परकाळे, खरेदी-विक्री संचालक बाळासाहेब मोरे , मा. सरपंच दिलीप परकाळे. नामदेव परकाळे,सुदाम परकाळे, मा. तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष परकाळे, अरविंद परकाळे ,मा. तंटामुक्ती अध्यक्ष विनोद मोरे ,विलास परकाळे,ग्रामपंचायत सदस्य सुभाष वायसे,ग्राम सुरक्षा दल अध्यक्ष मोहन चव्हाण,दादा कुचेकर,विष्णू चव्हाण, शकुल मोरे, प्रशांत कुचेकर,महेश चव्हाण,रंगेश परकाळे, हनुमंत पवार,ग्रामसेविका मुलानी ,कॉम्प्युटर ऑपरेटर चव्हाण आदी उपस्तीत होते.
स्वराज्य फर्निचर चे सुरेश परकाळे यांनी वड ,पिंपळ ,चिंच, जांभूळ आदी रोपटे ग्रामपंचायत ला वृषारोपन साठी भेट दिले व लवकरच ट्री गार्ड देण्याचे आश्वासन दिले.






