वेळे नंतरही दुकाने चालू ठेवणाऱ्यांवर कारवाई करा- बारामती व्यापारी महासंघ
वेळेनंतरही ज्या व्यापाऱ्यांची दुकाने चालू असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी.
वेळे नंतरही दुकाने चालू ठेवणाऱ्यांवर कारवाई करा- बारामती व्यापारी महासंघ.
करोनामुक्त झालेल्या बारामतीत अचानक पाच रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाकडून बाजारपेठा चालू ठेवण्याच्या वेळेत बदल करून दोन तासांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंतच दुकाने चालू राहणार आहेत.
प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेनंतरही ज्या व्यापाऱ्यांची दुकाने चालू असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांना देण्यात आले आहे.करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सहकार्य करण्याच्या दृष्टीने बारामती व्यापारी महासंघाने हा घेतला व प्रशासनाला तसे लेखी स्वरूपात पत्र देण्यात आले हे यावेळी उपस्थिती स्वप्निल मुथा ,महेश ओसवाल, नरेंद्र गुजराती होते.