कृषी
वैरण बियाण्यांसाठी शेतकरी व पशुपालकांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
अर्जदारांकडे स्वतःची जमीन तसेच सिंचनाची सुविधा असणे आवश्यक आहे.

वैरण बियाण्यांसाठी शेतकरी व पशुपालकांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
अर्जदारांकडे स्वतःची जमीन तसेच सिंचनाची सुविधा असणे आवश्यक आहे.
बारामती वार्तापत्र
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत चारा उत्पादन कार्यक्रमांतर्गत पशुधनासाठी सुधारित जातीच्या वैरण बियाण्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
याकरिता इच्छुक शेतकरी व पशुपालकांनी https://zppunecessyojana.com/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा. अर्जदारांकडे स्वतःची जमीन तसेच सिंचनाची सुविधा असणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी नजीकच्या पशुवैद्यकीय चिकित्सालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉ. धनंजय पोळ यांनी केले आहे.