वैशाली नागवडे मारहाण प्रकरणी संबंधितांवर कारवाई करा ; इंदापूरात राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्यांची मागणी
इंदापूर पोलिसांना दिले निवेदन
वैशाली नागवडे मारहाण प्रकरणी संबंधितांवर कारवाई करा ; इंदापूरात राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्यांची मागणी
इंदापूर पोलिसांना दिले निवेदन
इंदापूर : प्रतिनिधी
केंद्रीय महिला आणि बाल कल्याणमंत्री स्मृती इराणी यांच्या पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे यांना मारहाण झाल्या प्रकरणी संबंधितांना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेस महिला पदाधिकाऱ्यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन शनिवारी (दि.२१) इंदापूर पोलिसांना देण्यात आले.
सदरील निवेदनात म्हंटले आहे की,१६ मे २०२२ रोजी बालगंधर्व रंगमंदिर शिवाजी नगर पुणे या ठिकाणी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे कार्यक्रमाप्रसंगी गॅस दरवाढ विरोधात निवेदनाच्या अनुषंगाने महिला राष्ट्रवादी काँग्रेस पुणे विभागाच्या अध्यक्षा वैशाली नागवडे व इतर पदाधिकारी या गेल्या असता त्या ठिकाणी त्यांचेवर भारतीय जनता पार्टी चे भस्मराज त्रिकोणे, प्रमोद कोंढरे आणि मयूर गांधी या व्यक्तीने मारहाण केल्याने त्या कार्यकर्त्यांविरुद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यांना तात्काळ अटक करून कडक कारवाई करावी व न्याय द्यावा.
यावेळी इंदापूर तालुकाध्यक्षा छायाताई पडसळकर,शहराध्यक्षा उमा इंगोले,माजी नगरसेविका मंगला ढोले, शहर उपाध्यक्षा उज्वला चौगुले,शहर कार्यअध्यक्षा स्मिता पवार आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.